घरमहाराष्ट्रआता शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ३ वेळा हजेरी! का? वाचा...

आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ३ वेळा हजेरी! का? वाचा…

Subscribe

विद्यार्थ्यांची दिवसातून ३ वेळा हजेरी घेण्याच्या सुचना शालेय शिक्षण विभागाने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सकाळ,दुपार आणि संध्याकाळी शाळा सुटण्यापूर्वी हजेरी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा भाग म्हणून या सुचना देण्यात आल्या आहेत.

का दिल्या ३ वेळा हजेरीच्या सुचना?

- Advertisement -

दिवसेंदिवस शाळेच्या आवारातून अपहरण होणे,लैगिंक अत्याचारांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत देखील भर पडत आहे.मुलांच्या सुरक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलण्याच्या सुचना सर्व राज्यांना दिल्या. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने २ जून रोजी तसे परिपत्रक काढत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपयायोजना करण्याच्या सुचना शाळांना दिल्या आहेत.

काय आहेत मार्गदर्शक सुचना?

- Advertisement -

विद्यार्थ्यांविरोधात होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांसंबंधीची माहिती स्थानिक पोलिसांना देणे,सर्व शाळांमध्ये तक्रार पेटीची व्यवस्था करणे,शाळेच्या आवारात तसेच प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलिसांकडून घेण्याच्या सुचना देखील शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत. तसेच,शाळेत सोडणाऱ्या खासगी वाहन चालकाची माहिती पालकांनी स्व:ता जवळ ठेवायची आहे. शेवटचा विद्यार्थी बसमध्ये असेपर्यंत सेविका किंवा शिक्षिका सोबत असणे बंधनकारक आहे.विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक इजा पोहोचेल अशा शिक्षा विद्यार्थ्यांना करू नयेत असे देखील शाळांना बजावण्यात आले आहे.

शाळांवरील जबाबदारी

१. शाळेच्या परिसरात असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची राहणार.

२.शाळेच्या आवारात कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही, याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असणार आहे.

३. विद्यार्थ्यांची सकाळ, दुपार आणि शाळा सुटण्यापूर्वी हजेरी बंधनकारक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -