घरमहाराष्ट्रदेशात आता फक्त एकच वाघ तो म्हणजे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

देशात आता फक्त एकच वाघ तो म्हणजे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Subscribe

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कधी विचार केला असेल काय की त्यांच्या पुत्राच्या राज्यात हनुमान चालिसा म्हणणं देशद्रोह असेल. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालिसा पठण करणे हा राजद्रोह आणि औरंगजेबाच्या कबरीवर माठा टेकवणे हा राजशिष्टाचार असल्याचाही त्यांनी टोला लगावलाय. 

मुंबईः बाळासाहेब वाघ होते, पण आता देशात एकच वाघ आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय. गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

कालच्या सभेला ते म्हणत होते मास्टर सभा, पूर्ण भाषण ऐकल्यावर समजलं लाफ्टर सभा होती. काल संभाजी महाराज आणि भगवान नरसिंह यांची जयंती होती. आम्हाला वाटलं काही तेजस्वी आणि ओजस्वी ऐकायला मिळेल, पण लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही. त्याच गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. 100 सभांची बाप सभा असे आमचे मित्र म्हणत होते. पण 100 कौरव होते, पांडव पाच होते, काल कौरवांची सभा झाल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला.

- Advertisement -

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कधी विचार केला असेल काय की त्यांच्या पुत्राच्या राज्यात हनुमान चालिसा म्हणणं देशद्रोह असेल. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालिसा पठण करणे हा राजद्रोह आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणे हा राजशिष्टाचार असल्याचाही त्यांनी टोला लगावलाय.

औरंगजेब म्हणायचा संभाजी धर्म बदला, मुस्लिम धर्म स्वीकारा, पण संभाजी राजा कधीच बधला नाही. शेवटी औरंगजेबानं त्यांचा खून केला. पण आता पूर्ण हिंदुस्तानावर भगवा झेंडा फडकणार आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, त्यांनी तलवारी म्यान केल्या असतील, पण आम्ही तलवारी म्यान केलेल्या नाहीत, आम्ही मुकाबला निर्भिडपणे करणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचं. त्याच मैद्याचं पोत्याच्या पायावर नाक घासून उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री झालात. काल कोणीतरी ट्विट केले वाघ, फोटोग्राफी करून कोणाला वाघ होता येत नाही. उद्धवजी वाघाचे फोटो काढून कुणाला वाघ होता येत नाही. वाघ होण्यासाठी निधड्या छातीने आव्हानांचा सामना करावा लागतो. कुठला सामना केला तुम्ही सांगा, कुठल्या आंदोलनात तुम्ही होतात, कुठल्या संघर्षाला तुम्ही होतात, कुठल्या संघर्षाला नाही. दोन वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला. मैदानात कोण होतं, उद्धव ठाकरे होते पण फेसबुक लाईव्ह करत असल्याचा टोमणाही देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -