Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र आता मानहानीची नोटीस कोण पाठवणार, नितेश राणेंचा अनिल परब यांच्यावर खोचक निशाणा

आता मानहानीची नोटीस कोण पाठवणार, नितेश राणेंचा अनिल परब यांच्यावर खोचक निशाणा

शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून मला मानहानीची नोटीस येणार का?

Related Story

- Advertisement -

देशातील १ नंबरचे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील बंगल्याजवळ स्फोटक ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात आहे. सचिन वाझेंनी एनआयएच्या न्यायालयात पत्र लिहून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी अनिल परब आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वकिल साहेबांची आता लागली आहे. आता नोटीस कोण बनवणार असा सवाल नितेश राणे यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे. अनिल परब यांचे नाव सचिन वाझेंच्या पत्रात आल्याने नितेश राणेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. बुधावारी नितेश राणे यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावा आता पुरावे तयार असून वस्त्रहरण अटळ असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून मला मानहानीची नोटीस येणार का आता वकील साहेबांची (अनिल परब) लागली आहे तर मग नोटीस कोण बनवणार? असा प्रश्न उपस्थित करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

अनिल परब यांच्यावर काय आरोप

सचिन वाझेंनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केलाय की एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून ५० लाख रुपये मागितले. त्यांनी दुसरा आरोप केलाय की जानेवारी २०२१ला मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत असे म्हणत अनिल परब यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. मी आरोप नाकारतोय. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत, असेही परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

- Advertisement -