Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे मावळमध्ये शिवसैनिक आक्रमक, जुना पुणे- मुंबई महामार्गावर टायर जाळत महामार्ग रोखला

मावळमध्ये शिवसैनिक आक्रमक, जुना पुणे- मुंबई महामार्गावर टायर जाळत महामार्ग रोखला

Subscribe

दहा दिवसाच्या सत्ता संघर्षानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले होते. मात्र, यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ केली. मावळ येथील शिवसैनिकांनी जुना पुणे- मुंबई महामार्गावर टायर जाळत महामार्ग रोखून धरला. यावेळी भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन –

- Advertisement -

राजीनाम्यानंतर शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र, मावळ मधील शिवसैनिकांनी आक्रमक होत जुना पुणे- मुंबई महामार्गावर टायर जाळून महामार्ग रोखून धरला. यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा घोषणांनी महामार्ग दणाणून सोडला.

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा –

- Advertisement -

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत फूट पडली होती. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्यांनी भाजप सोबत युती करावी, अशी मागणी शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र, उद्धव ठाकरे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी शिंदे गटाला मुंबईत या मग त्यावर विचार करु, असे सांगितले होते. मात्र, एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील इतर आमदार हे मुंबईला यायला तयार नव्हते. अखेर राज्यपालांच्या एन्ट्रीनंतर महाविकास आघाडीकडीने बहुमत सिद्ध करण्याअगोदरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -