घरमहाराष्ट्रनागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बत्तीस शिराळ्यात कडक बंदोबस्त

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बत्तीस शिराळ्यात कडक बंदोबस्त

Subscribe

यंदा बत्तीस शिराळ्यामध्ये कोरोनाच्या दोनच्या ब्रेकनंतर उत्साहात नागपंमची साजरी केली जात आहे. आज घरोघरी नागांच्या मूर्तीचे पूजन करत सोप्या पद्धतीने सण साजरा करण्यात आला. पूर्वी बत्तीस शिराळ्याला जिवंत नागांची पूजा करणारा जिल्हा म्हणून ओळखले जायचे.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या ब्रेकनंतर यंदा सगळे सण उत्साहात साजरे केले जात आहेत. याचं दरम्यान, नागपंचमीचा सण साजरा करताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पूर्वी नागपंचमीला सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा होती. परंतु काही वर्षांपासून या प्रथेला विरोध केला जात होता. दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत या ऐतिहासिक नागपंचमीला परवानगी द्या आणि नागाला वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून वगळा अशी मागणी केली होती.

याबाबत सुब्रमण्यम समितीने भारतीय सण, उत्सव, परंपरा यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे सुचवले आहे. तसेच जिवंत नागाची पूजा करावी का नाही, याबाबतही कोणताच निर्णय देण्यात आला नाही. त्यामुळे यावर्षी सुद्धा न्यायालयाचे आदेश पाळत बत्तीस शिराळ्यामध्ये नागपंचमी साजरी केली जात आहे.

- Advertisement -

यंदा बत्तीस शिराळ्यामध्ये कोरोनाच्या दोनच्या ब्रेकनंतर उत्साहात नागपंमची साजरी केली जात आहे. आज घरोघरी नागांच्या मूर्तीचे पूजन करत सोप्या पद्धतीने सण साजरा करण्यात आला. पूर्वी बत्तीस शिराळ्याला जिवंत नागांची पूजा करणारा जिल्हा म्हणून ओळखले जायचे. २००२ पासून जिवंत नागांची पूजा करण्यावर बंदी करण्यात आली आहे. तेव्हापासून येथे घरोघरी नागाच्या मूर्तीची पूजा केली जाते.

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बत्तीस शिराळ्यात कडक बंदोबस्त
बत्तीस शिराळ्यामध्ये पोलिस विभागाच्या माध्यमातून ५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर १४ पोलिस निरीक्षक, ३५ सहाय्यक पोलिस निरीक्षक , १६ व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण तसेच शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे.


हेही वाचा :मखमलाबाद गावात आज नागोबाची यात्रा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -