घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमजुरांच्या टंचाईमुळे खोळंबली कांद्याच्या राजधानीतील लागवड

मजुरांच्या टंचाईमुळे खोळंबली कांद्याच्या राजधानीतील लागवड

Subscribe

प्रमोद उगले । नाशिक

 जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील कसमादे परिसराकडे कांद्याचे भांडार म्हणून पाहिले जाते. मात्र उन्हाळी कांदा लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांना मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे कांद्याची रोपे खराब होवू लागली आहेत. तसेच अनियमित विजपुरवठ्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

- Advertisement -

यावर्षी कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा लागवड करताना दिसत आहे. जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा म्हणजे कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड सुरू झाली आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांदा लागवड करताना मजूर टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की, मजुरांना अधिकची मजुरी देवूनही ते शेताकडे फिरकतही नसल्याचे चित्र आहे. मागच्यावर्षी २०० रुपये रोज अशी रोजंदारी होती. मात्र, यावर्षी तब्बल शंभर रुपयांनी वाढ होऊन ३०० रुपये रोज अशी रोजंदारी जिल्ह्यात विशेषत: कसमादे परिसरात दिली जात आहे. ३०० रुपये देवूनही कांदा लागवडीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. स्थानिक मजूर उपलब्ध नसल्याने अधिकचा खर्च करून नंदुरबार, पिंपळनेर, साक्री परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी मजूर आणत आहेत. या सर्वांचा एकूण खर्च बघता ४०० रुपये प्रतिदिन मजुरी देवून शेतकर्‍यांना कांदा लागवड करावी लागत

- Advertisement -
मजुरांच्या टंचाईची कारणे

कसमादे परिसरात एकाचवेळी कांद्याचे रोप लागवडीसाठी तयार झाल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून काही शेतकरी शेतात लाइट लावून रात्रीची कांदा लागवड करत आहेत.

अशी आहे रोजंदारी
  • कांदा लागवड प्रतिदिन (७ तास) : ३०० रुपये
  • कांदा लागवड (मक्तेदारी पद्धतीने) १ एकर : १० ते १५ हजार रुपये
  • निंदणी : २५० रुपये, शेताला वाफे बांधणे : ५०० ते ७०० रुपये प्रतिदिन

कांद्याच्या उत्पन्नापेक्षा लागवडीचाच खर्च जास्त असल्यामुळे पीक न परवडणारे झाले आहे. आस्मानी संकटाला तोंड देवून झाल्यावर आता मंजूर टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मागच्या वर्षी कांद्याला भाव न मिळाल्याने यंदा कर्ज काढून कांदा लागवड करावी लागत आहे. : रवींद्र बिरारी, कांदा उत्पादक

३०० रुपये रोज देवूनही मजूर कामाला यायला तयार होत नाहीत. मजूर आले तर विजेचा लपंडाव सुरू होतो. त्यामुळे आता कांदा लागवड करणे सोडून द्यावे कि काय असा प्रश्न डोळ्यापुढे उभे राहत आहे. परंतु कुठल्याच शेतीमालाला भाव मिळत नसल्याने नाईलाजास्तव कांदा लागवड करावी लागत आहे. : हितेंद्र बागूल, युवा शेतकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -