घरताज्या घडामोडीलोक येत जात असतात, आमच्याकडे पर्याय तयार आहे : अमित ठाकरे

लोक येत जात असतात, आमच्याकडे पर्याय तयार आहे : अमित ठाकरे

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौर्‍यावर आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या पाहिल्याच दिवशी पक्षाचे दोन विभागध्यक्ष आणि माजी नगरसेविका यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ते बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटात) सामील झाले आहेत. याबाबत अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘लोक येत जात असतात, आमच्याकडे त्यांना पर्याय लगेच तयार आहे’ असे वक्तव्य करत या गोष्टीला महत्व देत नसल्याचेही म्हंटले आहे.

अमित ठाकरे २७ आणि २८ डिसेंबर असे दोन दिवस संघटनात्मक बांधणीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. पक्षाचे शाखाध्यक्ष, पदाधिकारी, मनविसेचे पदाधिकारी या सगळ्यांशी ते ‘वन टू वन’ चर्चा करत कामकाजाचा आढावा घेत आहेत. यावेळी बोलताना पक्षातील पदाधिकार्‍यांनी व माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याबाबत भाष्य करताना ‘पक्षात लोक येत जात असतात. मनसेतही मुंबई मधील १५० भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. राजकारणात या गोष्टी होतच असतात. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जाणारे पण एक-दोन लोक जाताय. बाकी कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कोणी गेल्याने आम्हाला त्याचा फरक नाही पडत असे म्हणतानाच आमच्याकडे लगेच पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -
नाशिकला यायला कारण शोधतो

पत्रकारांशी संवाद साधताना अमित ठाकरे यांनी ‘मला नाशिकला यायला आवडत, मी नाशिकला येण्याचं कारणच शोधत असतो’ असे म्हंटले आहे. कधीकाळी राज ठाकरे यांचेही सातत्याने नाशिकला येणे होत होते. त्यांचेही नाशिकवर विशेष प्रेम होते. त्यांचे पुत्र अमित ठाकरेही आता नाशिकच्या प्रेमात पडले आहे असे म्हणाला हरकत नाही.

विशेषतः मनविसेच्या कार्यकारणी नियुक्तीसाठी दौरा

मनसे पक्षाची युवावाहिनी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदी अमित ठाकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर दौरा करून संघटना बांधणी केली. काही महिन्यापूर्वीच त्यांनी नाशिकमध्येही काही महत्वाच्या नियुक्त्या केल्या होत्या. प्रलंबित असलेल्या इतर नियुक्त्या करण्याच्या अनुषंगानेच विशेषतः या दौर्‍याचे नियोजन केले असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी दिली. आता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -