Petrol diesel price: राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात १०-१२ रुपये कपात करावी, फडणवीसांची मागणी

Nagar Panchayat Election devendra fadnavis reaction bjp is nomber one party in maharashtra
धनशक्ती सत्तेचा गैरवापर केला तरी भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार, फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात १० ते १२ रुपये कपात करुन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्राने राज्याचे जीएसटी परतावा द्यावा जेणेकरुन राज्यालाही नागरिकांना इंधन दरवाढीतून दिलासा देता येईल अशी मागणी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे जीएसटी परताव्याचे पैसे मिळत असतात ती कुठेही जात नाही असे फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच घरोघरी लसीकरणाच्या मोहिमेवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दुर्दैवाने ज्यांना पेट्रोल डिझेलच्या बाबतीत समजत नाही अशी मंडळी या सगळ्या गोष्टी बोलतात असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी जीएसटी परताव्याची मागणी केल्याच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले खरं म्हणजे राज्याची जीएसटीची रक्कम दरवर्षी मिळत असते ती कुठेही जात नाही. परंतु केंद्र सरकारने पेट्रोल -डिझेलवरचा टॅक्स ५ रुपयाने कमी केल्यावर तो ७ रुपयाने कमी होतो. त्यामुळे राज्य सरकारने आता १० ते १२ रुपयांनी इंधन दरवाढ कपात करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

केंद्राने राज्याचा जीएसटी परतावा द्यावा – पवार

राज्याच्या जीएसटी परताव्यावरुन शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्राने पेट्रोलचे दर ५ रुपये तर डिझेलचे दर १० रुपयांनी कमी केले आहेत. केंद्र सरकारने राज्याचे जीएसटी परताव्याची रक्कम दिली नाही ते केंद्र सरकारने लवकर द्यावे अशी मागणी शरद पवार यांनी दिले आहे. केंद्राने जीएसटी परतावा परत केला तर राज्याला पेट्रोल डिझेलचे दर कपात करण्यासाठी मदत होईल असे शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : petrol diesel price: इंधन दर कपातीसाठी केंद्राने राज्याचा जीएसटी परतावा द्यावा, शरद पवारांची मागणी