घरफोटोगॅलरीPhoto : आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महामानवाला अभिवादन

Photo : आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महामानवाला अभिवादन

Subscribe

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला पुष्पहार अर्पण केला आणि विनम्र अभिवादन केले.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ आरपीआय नेते अविनाश महातेकर, नागसेन कांबळे तसेच असंख्य भीम अनुयायी उपस्थित होते.

- Advertisement -

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार असे दावे कुणी कितीही करत असले तरीही ते अशक्य आहे, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला अनुसरून राज्याचा कारभार सुरू आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा,  असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाला भेटही दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला आहे, राज्यात देखील हा दिवस आपण साजरा करत असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -