घरमहाराष्ट्र'पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर देशात लॉकडाऊन'

‘पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर देशात लॉकडाऊन’

Subscribe

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा

देशात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे निवडणुकांचा धुरळा उडत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक दावा केला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देशात लॉकडाऊन जाहीर होईल, असा दावा पटोले यांनी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांना कोरोना नियमांचा विसर पडला आहे. कोरोना परिस्थितीत देशाचे पंतप्रधान प्रचारसभेत मग्न आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. आज मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान कमी आणि पक्षाचे प्रचारक जास्त आहेत. कोरोनाच्या संकटात देशाचे पंतप्रधान प्रचारासभेत मग्न असतील तर हे देशवासीयांचे दुर्दैव आहे. मध्य प्रदेशमधील सरकार पाडल्यानंतर अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन केलं. तो पर्यंत कोरोना देशात येऊ दिला. आता बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर तातडीने देशात लॉकडाऊन करण्यात येईल, असा दावा नाना पटोले यांनी केला. पंतप्रधान मोदींनी कोरोना ही महामारी असल्याचं जाहीर केलं. एकीकडे पंतप्रधान मास्क घालायला सांगतात, पण पंतप्रधान स्वत: प्रचारात मस्त आहेतअशी खरमरीत टीका नाना पटोले यांनी केली.

- Advertisement -

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजपासून कठोर निर्बंध लागू केले आहेत. या काळासाठी राज्य सरकारने जनतेसाठी आर्थिक पॅकेजही जाहीर केलं आहे. या पॅकेजवरुन टीका केली. यावर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला. घरातील माणसे मरत आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते मात्र राजकारणात दंग आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -