घरताज्या घडामोडीNawab Malik ED custody : नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी, सत्र...

Nawab Malik ED custody : नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी, सत्र न्यायालयाचा आदेश

Subscribe

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिकांना नियमित औषध बाळगण्यास आणि घरचा जेवणासाठी परवानगी देण्यात आली आहे. ईडीने अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना अटक केली आहे. मलिकांचे वकील अमित देसाई यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद करुन ईडीचे वकील अनिल सिंह यांचे आरोप खोडण्याचा प्रयत्न केला आहे. ईडीने नवाब मलिकांनी १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र पीएमलए कोर्टाने नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत म्हणजेच ८ दिवसाची ईडी कोठडी सुनावली आहे.

सत्र न्यायालयाच्या निर्णयावर चॅलेंज करायचे आहे की नाही त्यावर नंंतर उत्तर देऊ, उद्या अडीच वाजता अर्ज करण्यात येणार आहे. औषध, जेवण आणि चौकशीच्या वेळी वकील उपस्थित राहतील अशी परवानगी देण्यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती नवाब मलिकांचे वकील अमित देसाई यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

काय झाला युक्तिवाद?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने सेशन कोर्टात दाखल केले. यावेळी ईडीकडून अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह युक्तिवाद करत होते तर नवाब मलिक यांच्याकडून अॅड अमित देसाई युक्तिवाद करत होते. ईडीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना नवाब मलिकांचा अंडरवर्ल्ड आणि दाऊदची हस्तक हसीना पार्करशी मलिकांचा व्यवहारात संबंध असल्याचे सांगितले. ईडीने आपल्याला समन्स न देता घरुन ताब्यात घेतलं. ईडीच्या कार्यालयात आल्यावर जबरदस्ती समन्सवर सही घेण्यात आली. असा आरोप नवाब मलिकांनी कोर्टात केला आहे. यावर अनिल सिंह म्हणाले त्यांना घरीच ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना कार्यालयात नेल्यावर समन्सवर सही केली असल्याचा युक्तिवाद अनिल सिंह यांनी केला आहे.

नवाब मलिकांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमतत्ता खरेदी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दाऊदची हसीना पारकरचे निधन झालं आहे. ती मुंबईतील मालमत्ता पाहत होती. कुर्ल्यामधील गोवावाला कंपाऊंड हसीना पार्करच्या मालकीचे होते. ती जमीन नवाब मलिकांनी खरेदी केली आहे. दाऊदचा कारभार हसीना पारकर सांभाळत होती आणि ती त्याची मुख्य हस्तक होती. हसीनाने मरियमकडून मालमत्ता खरेदी केली होती. अनेक मालमत्ता ताब्यात घेऊन दहशतवादी कारवाईसाठी निधी हसीना पारकरने उभारला आहे. सलीम फ्रुट हा हसीना पारकचा हस्तक असल्याचा युक्तिवाद अनिल सिंह यांनी केला आहे.

- Advertisement -

सरदार खान या व्यक्तिचा मालमत्तेशी संबंध होता. तसेच सरदार खानचा 1993 च्या बॉम्ब स्फोटाशी संबंध होता आणि तो त्यामध्ये दोषी होता. तसेच गोवावाला कंपाऊंडचे मुख्त्त्यारपत्र सलीम फ्रुटकडे होते. यांच्याकडून नवाब मलिकांनी मालमत्ता खरेदी केली असल्याचा युक्तिवाद अनिल सिंह यांनी केला आहे. नवाब मलिकांचा अंडरवर्ल्डशी कसा संबंध होता याबाबत अनिल सिंह युक्तिवाद करत आहेत. गोवावाला कंपाऊंड एलबीएस रोडवर आहे. ही मालत्ता डी गॅंगशी संबंधित असून ती नवाब मलिकांच्या ताब्यात आहे. हाच मुद्दा ईडीच्या वकिलांनी कोर्टात उपस्थित केला आहे. मलिकांनी मालमत्तेसाठी ५५ लाख रुपये दिले होते.यामध्ये ५ लाख रुपये रोख आणि बाकीची रक्कम चेकद्वारे देण्यात आली होती असा युक्तिवाद अनिल सिंह यांनी केला आहे.

पीएमएलए कोर्टासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. त्यामुळे नवाब मलिकांची १४ दिवसांची ईडी कोठडी द्यावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली आहे. मलिक आणि अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे ईडीने सांगितले आहे.

नवाब मलिकांच्या वकिलांकडून युक्तिवाद

नवाब मलिक यांच्याकडून अॅड. अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. नवाब मलिकांनी मनी लाँन्ड्रिंग केली नाही त्यांच्यावर कऱण्यात आलेला आरोप चुकीचा आहे. नवाब मलिकांकडून काहीच मिळाले नाही. नवाब मलिकांविरोधातही ईडीकडे कोणता पुरावा नाही. २० वर्ष जुने व्यवहार झाले त्याबाबत ईडीकडे पुरावा नाही. १९९३ च्या बॉम्ब स्फोटाशी संबंधित लोकांशी कोणतेही संबंध ईडी दाखवू शकली नाही. सर्च ऑपरेशनमध्ये काही मिळाले नसताना अटक का? असा युक्तिवाद अमित देसाई यांनी केला आहे.

देशविरोधी कारवायांमध्ये नवाब मलिकांना गोवण्यात येत आहे. संपू्र्ण घटना २००३ पूर्वीची आहे. त्यामुळे तेव्हा कारवाई का करण्यात आली नाही. आता २० वर्षानंतर कारवाई कशी करत आहात? तुमच्याकडे अटक कऱण्याचे अधिकार आहेत का? अधिकार जबाबदारीने पार पाडायला हवेत, नवाब मलिकांना बदनाम करण्यात येतंय असा जोरदार युक्तिवाद वकील अमित देसाई यांनी केला आहे.

नवाब मलिकांचा ईडीच्या आरोपांशी काहीही संबंध नाही. पॉवर ऑफ अॅटर्नी १९९९ ची आहे. पीएमएलए कायद्याच्या आधी ६ वर्षे पॉवर ऑफ अॅटर्नी होती. मग आता कारवाई कशी असा युक्तिवाद देसाईंनी केला आहे. यामध्ये सलीम फ्रुटचा उल्लेख नाही असा सवाल केल्यानंतर ईडीने सलीम पटेल हाच सलीम फ्रूट असल्याचे स्पष्ट केलं आहे. सह आरोपींना ताब्यात घेऊन तपास करावा मलिकांचा यामध्ये संबंध नाही असे अमित देसाई म्हणाले आहेत. सलीम फ्रुट आणि सलीम पटेल हे वेगवेगळे व्यक्ती आहेत. ईडीने १५ फेब्रुवारीला केलेल्या छापेमारीमध्ये सलीम फ्रुटला अटक कऱण्यात आली होती. त्याची चौकशी करण्यात आली आहे. सलीम पटेल वेगळा व्यक्ती असून नवाब मलिक स्वतः पिडीत आहेत. त्यांना अंधारात ठेवून व्यवहार करण्यात आले आहेत. पीएमलए कोर्टात पिडितेचा जबाब महत्त्वाचा असतो. ईडी मोठे मोठे शब्द वापरुन व्यक्तीचे स्वतंत्र्य हिरावू शकते न्यायलय वस्तुस्थितीवर काम करते परंतु ईडीच्या या स्टोरीमध्ये काहीतरी राहिले आहे.

२० वर्ष जूना व्यवहार खोटा आहे. मुनिराचे आरोप सलीम पटेलविरोधात आहेत. नवाब मलिकांविरोधात नाही. नवाब मलिकांचा डी गँगशी संबंध नाही. २००५ मध्ये संबंधित मालमत्ता ३०० कोटीची असेल असं वाटत नाही. मलिक जबाबदार मंत्री असून त्यांना बदनाम करण्याचा डाव आहे.

दरम्यान वकील अमित देसाई यांनी टेरर फंडिंग शब्दावर आक्षेप घेतला आहे. उद्या दहशतवादी फंडींग ही हेडलाईन ईडीला करायची आहे का? काहीही मिळाले नसताना उगाच अशी नोंद करणं चुकीची आहे. टेरर फंडिंगवरुन अमित देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. रिमांडमध्ये कुठेही पीएमएलए कलमाचा उल्लेख नाही.


हेही वाचा : Nawab Malik Arrested: मनी लाँड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिकांना ‘ईडी’ कडून अटक

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -