आर्थिक फसवणूक करणारे अॅप काढून टाका, गुगल प्ले स्टोअरला सायबर पोलिसांच्या सूचना

police have instructed Google to remove the financial fraudulent app
अर्थिक फसवणूक करणारे अॅप काढून टाका, गुगल प्ले स्टोरला सायबर पोलिसांच्या सूचना

ऑनलाईन अॅपचा वापर करून अर्थिक व्यवहारामध्ये फसवणूकीच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. याची महाराष्ट्र सायबर सेलने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात पोलीसांनी गुगल प्ले स्टोअरला पत्र लिहिले आहे. यात पत्रात प्ले स्टोअरमधून अर्थिक फसवणूक करणारे अॅप काढून टाक किंवा डिलीट करा अशा सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा – Pension Update : पेन्शनधारकांनो 5 दिवसांत उरका ही काम; अन्यथा पेन्शन बंद होणार

13 बोगस अॅपची यादी –

डिजिटल बॅंकिंग किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्थिक व्यवहार करताना फसवणुकीचे किंवा फ्रॉडचे प्रकार वाढले आहेत. कर्ज देणारे अनेक अॅप असून त्यांचा हेतू लोकांना फसवणे असतो. अशा 13 बोगस अॅपची यादी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुगल प्ले स्टोअरला दिली आहे. याबाबत पत्र त्यांनी गुगल प्ले स्टोअरला दिले आहे. संबंधित 13 अॅप तुमच्या नियम अटींची पुर्तात करत नसतील तर त्या तुमच्या प्ले स्टोरमधून काढून टाका अशा सूचना केल्या आहेत. दरम्यान अशाप्रकारचे आणखी 18 अॅप सायबर पोलिसांच्या स्कॅनर खाली आहेत. या बाबत सुध्दा गुगलला पोलिस पत्र लिहणार आहेत.

हेही वाचा – केंद्रानंतर राज्याचाही दिलासा, पेट्रोल 2.8 पैशांनी तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त

1829 कर्ज फसवणुकीच्या ऑनलाईन तक्रारी प्राप्त – 

महाराष्ट्र सायबर पोलिसांना सुमारे 1829 कर्ज फसवणुकीच्या ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र सायबरकडे तक्रार आल्यानंतर ते स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देतात. त्यानुसार आजपर्यंत तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. सुमारे 9 नॉन कॉग्निझेबल (NC) प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सायबर गुन्ह्याची तक्रार लोक 1930 या हेल्पलाइन नंबरवर करू शकतात किंवा त्यांची ऑनलाईन तक्रार cybercrime.gov.in वर नोंदवण्याचे आवाहन, महाराष्ट्र सायबर पोलीसांनी केले आहे.