घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रफिटनेससाठी पोलिसांची सोमेश्वर मंदिर ते गंगापूर धरणापर्यंत दौड

फिटनेससाठी पोलिसांची सोमेश्वर मंदिर ते गंगापूर धरणापर्यंत दौड

Subscribe

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे ७५ किलोमीटर ‘दौड’चे नियोजन करण्यात आले आहे. २५ जुलै रोजी दहा किमीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून रविवारी (दि.३१) दुसरा टप्पा पूर्ण झाला. गंगापूररोड भागात पोलिसांनी तणावमुक्त राहण्यासह शरीर स्वास्थ्यासाठी दौड केली.

सोमेश्वर मंदिराच्या प्रांगणात पहाटे एकत्रित आलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांनी झुम्बा केला. त्यानंतर तिरंग्याच्या रंगातील फुगे आकाशी सोडून गंगापूर धरणाकडील एमटीडीसी रिसॉर्टकडे ‘दौड’ सुरू झाली. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे व महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ध्वज दर्शविला. गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रियाज शेख यांनी दौडचे नियोजन केले. वाटेत ढोल-ताशांच्या गजरात पोलिसांचे स्वागत झाले. हिंदी-मराठी गाण्यांवर थिरकून फिटनेस राखण्याचा ‘पण’ कर्मचार्‍यांनी केला. पहाटे सहा वाजता सोमेश्वर मंदिराच्या प्रांगणातून सुरू झालेली दौड बारदान फाटा, गंगापूर गावमार्गे गंगापूर रोपवाटिका रस्त्यावरुन धरणाच्या भिंतीपर्यंत पोहोचली. तिथून धरणाच्या भिंतीवरुन महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या ‘ग्रेप पार्क रिसॉर्ट’मध्ये सांगता झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १४ ऑगस्टपर्यंत दररोज तीन किलोमीटर याप्रमाणे २० दिवसांत ६० आणि शेवटच्या दिवशी १४ ऑगस्ट रोजी १५ किलोमीटर अंतराची दौड पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांकडून या दौडसाठी सराव सुरू आहे. दौडमध्ये उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, संजय बारकुंड यांसह सर्व सहाय्यक आयुक्त व पोलीस निरीक्षकांसह इतर आठशेहून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -