घरदेश-विदेशहर घर तिरंगा! राहुल गांधींनी डीपीवर तिरंगा ठेवला पण...

हर घर तिरंगा! राहुल गांधींनी डीपीवर तिरंगा ठेवला पण…

Subscribe

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने देशभरात हर घर तिरंगा मोहिम राबवली जात आहे. यात नागरिकांना घर, कार्यालयात 13 ते 15 ऑगस्टदरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. या मोहिमेला आता विरोधी पक्षांकडूनही पाठिंबा मिळत आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज बाईक रॅलीली हिरवा झेंडा दाखवला आहे. या रॅलीत अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने विरोधी पक्षांना आणि नेत्यांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. मात्र विरोधी पक्ष नेत्यांकडून या मोहिमेत सहभागी होण्यास सकारात्मकता दाखवली जात नाही, असे म्हटले जातेय.

दरम्यान भाजपच्या आरोपांनंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपला डीपी बदलला आहे. मात्र या डीपीमध्ये फक्त तिरंगा नाही तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हातात तिरंगा घेतलेला फोटो ठेवला आहे. यासोबत एक मेसेजही लिहिण्यात आला आहे, तो म्हणजे “देशाची शान आहे तिरंगा, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे तिरंगा’. यातून त्यांनी मोदींच्या आवाहनाला टोला लगावत पंडित जवाहरलाल नेहरुंचे विचार अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपकडून नेहमीच नेहरुंच्या विचारांवर टीका झाली, त्यांच्या कार्यपद्धतीवर भाजपकडून सातत्याने निशाणा साधला जातो. यात आता पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला काँग्रेसने प्रतिसाद देत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील पंडित नेहरुंचा हातात तिरंगा घेतलेला फोटो डीपीवर ठेवला आहे. तर काँग्रेसच्या अधिकृत ट्विट हँडलवर देखील हाच फोटो डीपी म्हणून ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा तिरंग्यासोबतचा फोटो शेअर करत एक खास मेसेजही लिहिण्यात आला आहे, काँग्रेसने ट्विटरवर लिहिले की, ‘तिरंगा आमच्या हृदयात आहे, रक्ताच्या रूपात तो आमच्या नसांमध्ये आहे. 31 डिसेंबर १९२९ रोजी पंडित नेहरूंनी रावी नदीच्या काठावर तिरंगा फडकवताना म्हटले होते, ‘आता तिरंगा फडकवला आहे, तो झुकावता कामा नये’, देशाच्या अखंड एकतेचा संदेश देणाऱ्या या तिरंग्याला आपण सर्वांनी आपली ओळख बनवूया. जय हिंद. #MyTirangaMyPride’ एकूण काँग्रेसकडून जरी पंतप्रधान मोदींच्या हर घर तिरंगा मोहिमेला पाठिंबा दिला जात आहे, मात्र यातून त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार पुढे नेण्याचे प्रयत्न केले जात आहे.

- Advertisement -


LIVE UPDATE : हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांना पोलीस कोठडी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -