कोरेगाव -भीमा प्रकरण, संभाजी भिडेंना जयंत पाटलांमुळे क्लीनचिट, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar allegation Koregaon Bhima case Sambhaji Bhide's clean chit due to Jayant Patil
कोरेगाव -भीमा प्रकरण, संभाजी भिडेंना जयंत पाटलांमुळे क्लीनचिट, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामुळे क्लीचिट मिळाली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तपास अधिकाऱ्याने भिडेंना क्लीन चिट दिली. त्याने सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दिले ते वाचले नाही. यामुळे कोर्टाला कळाले की, संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे दोषी आहेत. कोणाच्यातरी सांगण्यावरुन तपास अधिकाऱ्याने क्लीनचिट दिली आहे. संभाजी भिडेंच्या पाया पडत असताना जयंत पाटील यांचा फोटो व्हायरल झाला होता यावरुन सगळं काही लक्षात घेतलं पाहिजे असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

वंचित बहुजनच आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांना जयंत पाटील यांच्यामुळे क्लीन चिट मिळाली आहे. तपास अधिकारी संभाजी भिडे यांना क्लीन चिट देण्याच्या निष्कर्षापर्यंत कसा पोहोचला? न्यायालयात संभाजी भिडे यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्याचा प्रयत्न झाला तर त्याला विरोध करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक फोटो आहे. त्यामध्ये जयंत पाटील संभाजी भिडेंच्या पाया पडतात त्यामुळे सूत्र कुठून हालली हे लक्षात घेतलं पाहिजे. शरद पवार यांनी दावा केला की हे सगळं प्रकरण खोटं आहे. हा जो कांगावा करण्यात आला त्या काळी हा सगळा बोगस आहे. याचे सर्व कागदपत्र माझ्याकडे आहेत असे ते म्हणाले आहेत.

आंबेडकरांचे आरोप हास्यास्पद – पाटील

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. माझा संभाजी भिडेंशी माझा कोणताही संपर्क नाही. गेल्या काही वर्षांपासून ते माझ्या संपर्कातसुद्धा नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्या प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. याबाबत मला काही माहिती नाही. तसेच संभाडी भिडेंनी माझ्याकडे कधी कोणतीही मदत मागितली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी अशी खोटी आरोप करणं योग्य नाही. काही पुरावा असेल तर त्यांनी पुरावा द्यावा असा पलटवार जयंत पाटील यांनी केला आहे.


हेही वाचा : हरियाणातून 4 संशयित दहशतवाद्यांना स्फोटकांसह अटक; इनोव्हातून निघाले होते महाराष्ट्रात