घरताज्या घडामोडीराजावाडी रुग्णालयातील घटना शरमेनं मान खाली घालवणारी, दरेकरांचा घणाघात

राजावाडी रुग्णालयातील घटना शरमेनं मान खाली घालवणारी, दरेकरांचा घणाघात

Subscribe

उंदीर जर एखाद्या आयसीयूतील रुग्णाचे डोळे कुरतडत असेल तर यापेक्षा गंभीर दुसरी गोष्ट असू शकत नाही.

मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने एका रुग्णाचे डोळे कुरतडले असल्याचा प्रकार धक्कादायक आहे. राजावाडी रुग्णालयातील घटना मुंबई महानगरपालिका आणि मुंबईकरांची शरमेनं मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. असा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या ठिकाणी सॅनिटायझेशन झाले नाही का? संबंधित अधिकारी कुठे आहेत आसा सवालही दरेकर यांनी केला आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करुन अहवाल केवळ बासनात गुंडाळू नये असा घणाघातही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

डॉक्टरांनी आपल्या परीने महानगरपालिकेची बाजु सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु राजावाडी रुग्णालयातील प्रकार १०० टक्के मुंबईकरांची मान खाली घालयला लावणारी आहे. किंबहूना महापालिका अशा प्रकारे भयानक गोष्ट झाली आहे. अशा प्रकारची गोष्टी यापुर्वी सायन रुग्णालयातही झाली होती. जगात उत्तम महापालिका, कोविडच्या काळातील कामगिरीसाठी पाठ थोपटून घेत आहेत. अशा वेळी उंदीर जर एखाद्या आयसीयूतील रुग्णाचे डोळे कुरतडत असेल तर यापेक्षा गंभीर दुसरी गोष्ट असू शकत नाही. काम चालू असल्यामुळे आला आसेल काही कारणं सांगण्यात आली परंतु हा रुग्णालयाचा प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार सॅनिटायझेशनची आवश्यकता असते जर सॅनिटायझेशन उत्तम असते तर उंदिर येऊ शकला नसता असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान जर सॅनिटायझेशन करणारी यंत्रणा कमी पडली का? सॅनिटायझेशन संबंधित अधिकारी कुठं आहे? या सगळ्याची सखोल चौकशी करायला पाहिजे. परंतु चौकशी करुन अहवाल आल्यावर तो बासनात बांधून गुंडाळला असंही होता कामा नये. यापुर्वी असेच प्रकार झाले असूनही चुका सुधारत नाही. याबाबत अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

डॉक्टरच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील पूजा पाखरे या महिलेचे सिजर करताना बँडेज पट्टीचा बोळा डॉक्टरच्या चुकीमुळे पोटातच राहिला,त्यातच त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. अशा अक्षम्य चुका होऊन देखील राज्य सरकारद्वारे संबंधितांवर अजून कारवाई का नाही झाली? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -