घरताज्या घडामोडीदाऊदशी संबंध असणाऱ्यांसाठी आंदोलन करतायत, यापेक्षा राजकारणाची अधोगती नाही, प्रवीण दरेकरांचा घणाघात

दाऊदशी संबंध असणाऱ्यांसाठी आंदोलन करतायत, यापेक्षा राजकारणाची अधोगती नाही, प्रवीण दरेकरांचा घणाघात

Subscribe

विना समन्स अटक करता येत नसल्याचा युक्तिवाद केला त्यावर कोर्टाने स्पष्टपणे सांगितले PMLA (१९) ॲक्टनुसार कारवाई केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. नवाब मलिक ईडी कोठडीत असूनही त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. तसेच नवाब मलिक हटाव आणि देश बचाओ असे अभियान भाजपने राज्यभर सुरु केले आहे. दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मलिकांसाठी सत्ताधारी पक्षातील नेते आंदोलन करतात यापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती झाली नव्हती असा हल्लाबोल भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सत्ता जाण्याची चिंता असल्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही असेही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

विधान परिषधेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, नवाब मलिक हटाव, देश बचाओ” असे अभियान भाजपाने राज्यभर सुरु केले आहे. कारण शंभर वेळा एखादी गोष्ट ते खोटी सांगत असून जसे काय सूड भावनेने कारवाया सुरु आहेत आणि आम्ही साधुसंतांचे अवतार आहोत असा ते आव आणीत आहेत, महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करण्याचा जो महाविकास आघाडी सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे तो हणून पडण्याचे काम या अभियान अंतर्गत आम्ही करणार आहोत. नवाब मलिक कसे दोषी आहेत, आम्ही तक्रार केली नाही तर न्यायालयाने त्यांना कोठडी दिली आहे असे असूनही नवाब मलिक अजूनही मंत्री मंडळात आहेत. दाऊदशी संबंध असल्याचे ज्यांच्यावर आरोप आहेत. त्यांच्या बचावासाठी सरकारी पक्षातील मंत्री व नेते आंदोलन करतायत त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती कधीच झाली नाही असे प्रवीण दरेकर म्हणाले.

- Advertisement -

धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

नवाब मलिकांना देशभक्त दाखवण्याचा प्रयत्न होतोय. एकीकडे स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि दुसरीकडे मुस्लिमांवर कारवाई होते असे सांगून धार्मिक रंग द्यायचा हे योग्य नाही. सलिम पटेल आणि शाहवली खान यांच्यामार्फत जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार झाली. मुनीरा पटेल यांना पैसे न देता मुनीर पटेल आणि शाहवली खान यांनी मुख्त्यार केले. यात नवाब मलिक यांचा संबंध उघड झाला त्यामुळे कारवाई झाली असे प्रवीण दरेकर म्हणाले. विना समन्स अटक करता येत नसल्याचा युक्तिवाद केला त्यावर कोर्टाने स्पष्टपणे सांगितले PMLA (१९) ॲक्टनुसार कारवाई केली. मनिलॉंड्रिंग मध्ये अडकल्याने त्यांना अटक केलीय. तसेच भाजपने नाही तर नवाब मलिकांना कोर्टाने शिक्षा दिली असल्याचा पलटवार प्रवीण दरेकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : उद्धव ठाकरे शरद पवारांसमोर न झुकल्यास भाजप 100 टक्के समर्थन देणार, आशिष शेलारांचं मोठं विधान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -