पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेट्रोतून प्रवास, तरुणांबरोबर स्थानिकांशी साधला संवाद

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुंबईत ३८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला आहे. मोदींच्या हस्ते मेट्रो २ अ, मेट्रो ७, ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ४०० किमी काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांचं भूमीपूजन आणि विविध प्रकारच्या विकासकामांचं उद्घाटन मोदींनी केलं आहे. यावेळी मोदींनी भाषण करत मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर नरेंद्र मोदींनी गुंदवली-मोगरापाडा दरम्यान मेट्रोतून प्रवास केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुंदवली मेट्रो स्टेशनवर ‘मुंबई वन’ हे विशेष ॲप सादर केले. मेट्रो तिकीट ऑनलाइन काढण्यासाठीचे हे विशेष ॲप आहे. यासह मेट्रो तिकीट काढण्यासाठी राष्ट्रीय समान वाहतूक कार्डदेखील नरेंद्र मोदींनी सादर केले. त्यानंतर पीएम मोदींनी गुंदवली मेट्रो स्टेशनची पाहणी केली आणि मुंबई मेट्रोमधूनही प्रवास केला.

नरेंद्र मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्टेशनवरुन मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते. मोदींनी मेट्रोतून प्रवास करताना तरुणांबरोबर स्थानिकांशीही संवाद साधला.

११ डिसेंबर रोजी मोदींनी नागपूर दौरा केला होता. यावेळी नागपूर मेट्रो फेज 1 चे उद्घाटन आणि मेट्रो 2 च्या शिलान्यास कार्यक्रमाअंतर्गत नरेंद्र मोदी यांनी मेट्रोमधून प्रवास केला. यावेळी मोदींनी विद्यार्थी विद्यार्थिनींशी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्याआधी मोदींनी नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तिला रवाना केले. त्यानंतर त्यांनी झिरो माइल वर असणाऱ्या फ्रीडम पार्क येथे मेट्रोचे तिकीट काढले होते.

मुंबईचा कायापालट करणार 

आगामी वर्षात मुंबईचा कायापालट होईल. प्रत्येकासाठी मुंबईत राहणं सुविधेचं होईल. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांवरुन मुंबईत येणं-जाणं सुलभ होईल. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीस यांना अभिनंदन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा : समर्पित प्रशासन असेल तरच शहरातील विकासाला वेग, मोदींनी मुंबईत फोडला प्रचाराचा