घरमहाराष्ट्रकाँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणूक : राहुल गांधींच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध?

काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणूक : राहुल गांधींच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध?

Subscribe

मुंबई – काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींची बिनविरोध निवड करण्याचा ठराव महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या बैठकीत संमत झाला. या बिनविरोध निवड करण्याच्या प्रस्तावावेळी बैठकीत उपस्थित सगळ्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला. मात्र, यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी हात वर केला नव्हता, अशी माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसकडून ठराव मंजूर –

- Advertisement -

राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगड पाठोपाठ महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने खासदार राहुल गांधींना पक्ष अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे. सोमवारी (19 सप्टेंबर) पक्षातील नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह इथे पार पडली. या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला होता. या बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

शशी थरुर लढवणार काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक –

- Advertisement -

एकीकडे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानसह आणि दिल्लीसह अनेक राज्यांतील काँग्रेस समित्यांनी राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्याचा ठराव मंजूर केला आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. त्यासाठी त्यांना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडूनही परवानगी मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शशी थरुर यांनी सोमवारी दिल्लीत सोनिया गांधींची याबाबत भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशी थरुर यांना पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास सोनिया गांधींकडून मंजुरी मिळाली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -