Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

Subscribe

मुंबई – राज्यातील अनेक हायप्रोफाईल खटले हाताळणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मंगळवारी सकाळी उज्ज्वल निकम देवेंद्र फडणीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी उज्ज्वल निकम आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही काळ चर्चा झाली. उज्ज्वल निकम सध्या काही खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम पहत आहेत. या सर्व खटल्यांची माहिती देवेंद्र फडणवीसांनी जाणून घेतल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच उज्ज्वल निकम यांनी ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर निकम देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे देवेंद्र फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांची भेट नक्की कोणत्या कारणासाठी होती हे अद्याप स्पष्ट जालेले नाही. मात्र, शिंदे फडणवीस सराकर भविष्यात त्यांच्यावर एखादी महत्वपूर्ण जबाबदारी सोपवणार का, हे देखील पहावे लागेल

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्य बंडानंतर शिवसेना फुटल्याने सत्तांतर झाले होते. त्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाल आहे.शिंदे गटातील १६ आमदारांची अपात्रता आणि शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरु आहे. . यापूर्वी उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडली आहे. एखादा खटला त्यांच्याकडे गेला की त्याचा निकाल सरकारच्या बाजूने लागणार, असे जवळपास गृहीतच धरले जायचे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात उज्ज्वल निकम हे एकनाथ शिंदे गटासाठी आपले कायदेशीर कौशल्य पणाला लावणार का, याविषयी आता चर्चांना सुरुवात झाली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -