घरताज्या घडामोडीPune Ambil Odha: आंबिल ओढा परिसरात कारवाई महापालिकेकडून, केदार असोसिएट्सचे स्पष्टीकरण

Pune Ambil Odha: आंबिल ओढा परिसरात कारवाई महापालिकेकडून, केदार असोसिएट्सचे स्पष्टीकरण

Subscribe

आम्ही स्थानिकांना दिलेल्या नोटीसा नसून निवेदन आहे. आजची कारवाई आम्ही केलेली नाही.

पुण्यातील आंबिल ओढा (Ambil Odha) परिसरातील रहिवाश्यांच्या घरावर अतिक्रमण विभागाकडू कारवाई करण्यात आली. तिथल्या स्थानिक रहिवाशांची घरे तोडून बेचिराक करण्यात आलीत. केदार बिल्डरच्या नोटीशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा तिथल्या स्थानिकांनी केला आहे. मात्र ‘आम्ही स्थानिकांना दिलेल्या नोटीसा नसून निवेदन आहे. आजची कारवाई आम्ही केलेली नाही. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. नाला सरळीकरणासाठी काम होत असल्याने महापालिकेकडून कारवाई केल्याचे’, केदार असोसिएट्सचे प्रताप निकम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. (Pune Ambil Odha: Action by Municipal Corporation in Ambil Odha area, explanation of Kedar Associates)

२६ मार्च २०२१ ला जाहीर प्रकटन देण्यात आले होते. त्याला प्रसिद्धी देण्यात आली होती. त्या जागेवर फ्लेक्स लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे नालाबाधित लोकांना नोटीसा देखील बजावण्यात आल्या होत्या. कारवाई झालेल्या प्लॉटच्या शेजारी आमचा एसआरएचा प्रकल्प सुरु आहे. नालाबाधित क्षेत्र हे पुणे महापालिकेच्या हातात आहे. त्यामुळे महापालिका त्यावर कारवाई करत आहे. त्यामुळे याचा आमच्याशी काही संबंध नाही. नालाबाधित क्षेत्रातील लोक बेघर होऊ नये यासाठी त्यांना २०० मीटरवर ट्रान्सिस कॅम्प देण्यात आले आहेत. ज्यात त्यांचे तात्पुरते पुर्नवसन करण्यात येणार होते. लोकांना इतत्र कुठेही शिफ्ट करण्यापेक्षा त्यांना नाल्यालगतच्या आमच्या एसआरएच्या प्रोजेक्टमध्ये नालाबाधित क्षेत्रातील १३० लोकांचा समावेश करु असे महापालिकेला आमच्याकडून सांगण्यात आले होते,असे केदार असोसिएट्सचे प्रताप निकम यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सहा महिन्यांपूर्वी पालिका आयुक्तांचा नाल्याचे बांधकाम करण्याचा निर्णय झाला होता. मार्च महिन्यापासून इथल्या स्थानिका लोकांना याविषयीची माहिती देण्यात आली होती. महापालिका आयुक्तांनी या स्थळी भेट दिली होती. त्याचप्रमाणे स्थानिकांच्या एसआरए आणि महापालिकेत बैठका झाल्या. चार महिन्यापासून सांगूनही तिथले स्थानिक लोक जागा सोडायला तयार नाहीत. तिथल्या नाल्याचे काम न झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून लगच्या प्लॅनमध्ये नाल्याचे पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. त्यामुळे पावसाच्या आधी हे काम करणे गरजेचे असल्याचे पालिकेकडून हे काम करण्यात येत आहे,असे निकम यांनी सांगितले.

ज्या नोटीसा स्थानिक लोक दाखवत आहेत. त्या नोटीसमध्ये त्या लोकांना देण्यात आलेल्या फ्लॅटच्या नंबरची यादी देण्यात आली होती. १३० पात्र लाभार्थ्यांनी मार्चमध्ये नोटीस दिल्यानंतर ५० ते ६० लोकांनी त्यांचे पुर्नवसन करुन घेतले. काही भाडे घेऊन बाहेर पडले. आता केवळ ६० लोकांचे पुर्नवसन करणे बाकी आहे.

- Advertisement -

पुण्याच्या महापौरांनी हात झटकले

आंबिल ओढा परिसरातील रहिवाश्यांच्या घरावर झालेल्या कारवाईशी महापालिकेचा कोणताही संबंध नसल्याचे म्हणत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हात झटकले आहेत. ९० टक्के स्थानिकांनी अँग्रिमेंट दिल्या. या प्रकरणी एसआरएने लक्ष घालण्याची गरज असल्याचे, पुण्याच्या महापौरांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Pune Ambil Odha: आता आम्ही कुठे जायचे? चिमुरड्याचा आक्रोश

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -