घरमहाराष्ट्रपुण्यामध्ये आलिशान गाडीचे आलिशाना सेलिब्रेशन

पुण्यामध्ये आलिशान गाडीचे आलिशाना सेलिब्रेशन

Subscribe

पुण्यामध्ये एका शेतकऱ्याने खरेदी केलेल्या जॅग्वार कारचे दमदार सेलिब्रेशन केले आहे. या व्यक्तीने गाडी घेतल्याच्या आनंदात चक्क सोन्याचे पेढे वाटले.

पुण्यामध्ये नेहमी काहीना काही आगळ्या वेगळ्या गोष्टी घडताना पहायला मिळाले आहे. अशीच आणखी एक गोष्ट पुण्यात घडली आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पुण्याच्या धायरीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने अलिशान जग्वार कार खरेदी केली. कार खरेदीचे त्यांनी आगळे वेगळे सेलिब्रेशन केले. त्यांनी चक्क सर्वांना सोन्याचे पेढे वाटले. तुम्हाला पण आश्चर्यच वाटले असले ना. पण हे खरे आहे.

वाटले सोन्याचे पेढे

पुण्याच्या धायरीमध्ये राहणाऱ्या सुरेश पोकळे यांनी जग्वार एक्सएफ ही अलिशान गाडी खरेदी केली. पोकळे यांचा कार खरेदीचा आनंद गगणात मावत नव्हता. त्यांनी अलिशान कार खरेदीचे देखील अलिशान सेलिब्रेशन केले. सगळे जण साधे पेढे वाटतात आपण सोन्याचे पेढे वाटावेत अशी त्यांची इच्छा होती. पुण्यातील प्रसिध्द मिठाईवाला काका हलवाई यांच्याकडे त्यांनी सोन्याच्या पेढ्याची कल्पना सांगितली. त्यांनी होकार देत पाकळे यांना सोनेरी वर्ख केलेले पेढे तयार करुन दिले.

- Advertisement -

एक पेठा २३३ रुपयांचा

सुरेश रामनाथ पोकळे हे यांचा वडिलोपार्जीत शेतीचा व्यवसाय आहे. सोन्याचा पेढा म्हटल्यावर सर्वांना प्रश्न पडलाच असेल की, या पेढ्याची किंमत किती असले. तर या सोन्याच्या एका पेढ्याची किंमत २३३ रुपये आहे. पोकळे यांनी गाडीचे सेलिभ्रेशन करण्यासाठी ७ हजार किलो दराने सोन्याचे वर्ख केलेले पेढे मागवले. या पेढ्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि केशर वापरून सोनेरी वर्ख केले आहे. गाडी घेतल्यामुळे पोकळे कुटुंबियांनी आपल्या आप्तस्वकीयांना सोन्याचे पेढे वाटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -