घरमहाराष्ट्रकोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला जुळ्यांना जन्म; टेस्ट केल्यानंतर बाळं निगेटिव्ह!

कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला जुळ्यांना जन्म; टेस्ट केल्यानंतर बाळं निगेटिव्ह!

Subscribe

पूर्णपणे बरे होईपर्यंत बाळांपासून दूर रहाण्याचा सल्लाही या महिलेला देण्यात आला आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या महाराष्ट्रातील पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ३४ वर्षीय महिलेने एका खासगी रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या महिलेने दिलेल्या दोन जुळ्या बाळांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या महिलेला बाळांपासून दूर आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. पूर्णपणे बरे होईपर्यंत बाळांपासून दूर रहाण्याचा सल्लाही या महिलेला देण्यात आला आहे.

रूग्णालयात दाखल केल्यानंतर समजले महिला पॉझिटिव्ह

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी पुण्यातील इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयात या महिलेने मुलांना जन्म दिला. या महिलेच्या शरीरावर सूज येत असल्याने आणि प्रसुती वेदना होत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच उच्च रक्तदाबामुळे महिलेची तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांना शंका आली. महिला ज्या भागात राहते तेथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरला असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी तिची कोरोना चाचणी केली असता तिला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -
दोन्ही मुले कोरोना निगेटिव्ह

यानंतर, महिलेची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे या महिलेने मुलगी व मुलाला जन्म दिला आहे. दोन्ही मुले पूर्णपणे निरोगी आहेत. जुळ्या मुलांसह गर्भवती असल्यामुळे तिला आपत्कालीन परिस्थितीत भरती केले होते. महिला रेड झोनमधून आल्यामुळे कोरोनाचे लक्षण दिसताच तिची चाचणी केली. सध्या दोन्ही मुले कोरोना निगेटिव्ह असून सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.


कोरोनाच्या भितीने ‘त्याने’ बहिणीला घरी नेण्याचा निर्णय घेतला, पण वाटेत मृत्यूने गाठले!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -