पुणे: पुणे हे शहर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतंच. पुण्यातील कोयता गँग असुद्या किंवा मग सततच्या होणाऱ्या चोऱ्या असुद्या. या सगळ्यातच आता पुन्हा एकदा पुणे चर्चेत आलं आहे. पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी पोलीस ठाण्यातच दरोडा टाकला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या दुचाकी विकल्या आहेत. या घटनेनंतर तत्काळ कारवाई करत पोलिसांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. (Pune News Police robbery in police station itself Shocking information is revealed in the investigation)
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे, अशी दरोडा टाकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीकडे चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितल्या, अशी धक्कादायक कबुली दिली. तसंच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस कर्मचाऱ्यांनी या आरोपीला त्या दुचाकी परस्पर बाजारात विकायला सांगितल्या.
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी टाळाटाळ केली तसंच चौकशीसाठीही उपस्थित राहिले नाहीत. परिणामी, कर्तव्यात कसून केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सोमवारी या 4 पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर केली.
पुणे पोलिसांमार्फत मुद्देमालातील दुचाकी भंगारवाल्याला विकणाऱ्या पुण्याच्या लोणीकाळभोर पोलीस स्थानकातील पोलिसांना तातडीने निलंबन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपायुक्तांनी तडकाफडकी या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबनाचा आदेश काढला आहे. तर, या घटनेमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
(हेही वाचा: BJP on Hemant Soren: आपण यांना पाहिलंत का? मुख्यमंत्र्यांना शोधा आणि मिळवा 11 हजार; भाजपाकडून बॅनरबाजी )