घरमहाराष्ट्रपुणेवसंत मोरेंवर 'या' मतदारसंघाची जबाबदारी, मनसेची नवी व्यूहरचना

वसंत मोरेंवर ‘या’ मतदारसंघाची जबाबदारी, मनसेची नवी व्यूहरचना

Subscribe

पुणे – भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 नुसार काम सुरू केले आहे. भाजप पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. राज ठाकरेंनी पुणे ग्रामीण मधील तीन लोकसभा मतदारसंघासाठी पक्ष निरीक्षक पदाच्या निवडी जाहीर केल्या आहेत. पुणे ग्रामीण मधील मावळ, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदासंघातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघाची जबाबदारी वसंत मोरे यांना देण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पुणे ग्रामीण- मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात किशोर शिंदे, हेमंत संभूस आणि गणेश सातपुतेंची पक्ष निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदावर अजय शिंदे आणि बाळा शेडगेंची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामती मतदारसंघामध्ये पक्ष निरीक्षक म्हणून वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र, राज ठाकरेंनी त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या उमेदवारांच्या मतदारसंघामध्ये भाजपविरोधात लाव रे तो व्हिडिओ म्हणत अनोख्या पद्धतीनं प्रचार केला होता. राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीकडे मनसे संधी म्हणून पाहत आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने आतापासून तयारी सुरु केल्याचे संकेत मिळत आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -