घरमहाराष्ट्रहोम क्वारंटाईन शिक्के पाण्याने धुवून लोक घराबाहेर; पुण्यात एकच खळबळ!

होम क्वारंटाईन शिक्के पाण्याने धुवून लोक घराबाहेर; पुण्यात एकच खळबळ!

Subscribe

भोरच्या नेरे सरकारी रुग्णालयात होम क्वारंटाईनचे मारलेले शिक्के पाण्याने धुतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.

देशभरासह राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून कडक नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. दरम्यान कोरोनाचे रूग्ण राज्यभरात आढळून येत असल्याने संशयित रूग्णाची तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून त्यांना १४ दिवस घरी राहण्याच्या सुचना दिल्या जातात. मात्र पुण्यातील भोरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

भोरच्या नेरे सरकारी रुग्णालयातून रूग्णांना होम क्वारंटाईनचे मारलेले शिक्के पाण्याने धुतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या प्रकारामुळे क्वारंटाईन शिक्क्यांसाठी वापरली जाणारी शाई निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बरेच जण हातावरचा हा शिक्का पाण्याने धुवून क्वारंटाईनचे नियम तोडून घराबाहेर पडत आहेत. ज्या लोकांच्या हातावर हा शिक्का मारला आहे त्यांनीच शिक्का पाण्याने काढता येत असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने दखल घेत वैद्यकीय अधिकारी यांना निकृष्ट दर्जाची शाई बदलून पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यासारख्या काही भागात होम क्वारंटाईनचे शिक्के हातावर असताना देखील हे लोकं बाहेर फिरताना दिसले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असली तरी घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे.

मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण असल्याने संपूर्णत: पुणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय कोणत्याच कारणासाठी घराबाहेर पडू नये, असे पोलिसांनी आवाहन केल आहे.

- Advertisement -

या सीमा होणार सील 

पुणे महापालिकेचे क्षेत्र, पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्र, संपूर्ण हवेली तालुका, शिरुर आणि वेल्हे तालुक्यांचा काही भाग आणि बारामती नगर परिषदेची संपूर्ण हद्द संक्रमणशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलंय. या संक्रमणशील क्षेत्राला २७ एप्रिलपर्यंत सील करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात येता येणार नाही.

पुणे – १७ (मृत्यू १)

पुणे मनपा – ५४६ (मृत्यू ४९)

पिंपरी-चिंचवड मनपा – ४८ (मृत्यू १)


Lockdown- आख्खं पुणे ७ दिवसांसाठी सील; पालिका आयुक्तांची घोषणा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -