घरताज्या घडामोडीचित्रा वाघ आणि फिर्यादीच्या आरोपामुळे परिवाराच्या प्रतिष्ठेला धक्का, कुचिक यांच्या मुलीचे महिला...

चित्रा वाघ आणि फिर्यादीच्या आरोपामुळे परिवाराच्या प्रतिष्ठेला धक्का, कुचिक यांच्या मुलीचे महिला आयोगाला पत्र

Subscribe

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील तरुणीने लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप केला आहे. लग्नाचे खोटे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप कुचिक यांच्यावर करण्यात आला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि पीडित तरुणी संगनमताने कुचिक यांच्यावार आरोप करत आहेत. तसेच परिवाराच्या प्रतिष्ठेला टीकांमुळे धक्का बसत असल्याचा आरोप कुचिक यांच्या मुलीने महिला आयोगाला पत्र लिहून केला आहे. चित्रा वाघ आणि फिर्यादी यांच्या संगनमताची चौकशी आणि त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी कुचिक यांच्या मुलीने केली आहे.

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिले आहे. रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याकामी न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर मुक्त आहेत व सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. असे असताना देखील चित्रा वाघ गुन्ह्याविषयी असंबंध आणि खोटी माहिती माध्यामांवरून प्रसारित करून कुचिक यांचेविषयी अपमानजनक टीका करत आहेत, त्यामुळे माझ्या परिवाराच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्याचप्रमाणे फिर्यादीने यापूर्वीही इतर प्रतिष्ठित व्यक्तिबाबत याचप्रकारे आरोप करून विवध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले आहेत.

- Advertisement -

चित्रा वाघ यांची नार्को टेस्ट करावी

फिर्यादी व चित्रा वाघ हे जाणीवपूर्वक आणि संगनमताने याप्रकरणाची मीडिया ट्रायल चालवीत आहेत. असे प्राची कुचिक यांनी उपरोक्त अर्जात नमूद केले आहे तसेच या प्रकरणी प्रसार माध्यमांवरून खोटे व अपमानजनक आरोप करू नये असे प्रतिबंधात्मक आदेश व्हावेत तसेच फिर्यादी व चित्रा वाघ यांच्यामधील संगनमताची चौकशी व्हावी त्यांची नार्को चाचणी करावी अशी मागणी अर्जदार प्राची कुचिक यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे.

- Advertisement -

तपास करण्याचे निर्देश

रघुनाथ कुचिक यांच्या पत्राची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल तपासणी करून याचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना दिले आहेत.


हेही वाचा : नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -