घरताज्या घडामोडीVideo : बच्चन पांडेनंतर अक्षय कुमार आणतोय प्रेक्षकांसाठी नवा सेल्फी, पाहा...

Video : बच्चन पांडेनंतर अक्षय कुमार आणतोय प्रेक्षकांसाठी नवा सेल्फी, पाहा धम्माल व्हिडीओ

Subscribe

बच्चन पांडे मधील अक्षयच्या दमदार अभिनयानंतर अक्षय कुमारचा सेल्फी हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारसह सिनेमात नुसरत भरुचा, डायना पेंटी , इमरान हाशमी हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत.

बॉलिवूडमध्ये एका वर्षात सर्वाधिक सिनेमा करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये खिलाडी अक्षय कुमारचे नाव सर्वात टॉपवर आहे. अक्षयचा नुकताच रिलीज झालेला बच्चन पांडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत चांगली कमाई करतो आहे. बच्चन पांडे मधील अक्षयच्या दमदार अभिनयानंतर अक्षय कुमारचा सेल्फी हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारसह सिनेमात नुसरत भरुचा, डायना पेंटी , इमरान हाशमी हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. या कलाकारांनी सिनेमाचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली आहे. कलाकारांनी सिनेमातील एका गाण्यावर व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात सगळे सेल्फी सिनेमाची स्क्रिप्ट हातात घेऊन कारमध्ये बसलेले दिसत आहेत. प्रत्येकाच्या फाईलवर “Selfiee” असे लिहिले आहे. सेल्फीच्या टायटल ट्रँकवर कलाकार धम्माल डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओत इमरान आणि अक्षय यांच्या मध्ये नुसरत भरुचा बसलीय तर खाली डायना पेंटी बसली आहे. अक्षय कुमार व्हिडीओत वेगळीत रिअँक्शन देताना दिसतो. या व्हिडीओतून सिनेमाचं धम्माल टायटल ट्रँक पाहायला मिळत आहे. धम्माल टायटल ट्रँकप्रमाणे सिनेमा देखील धम्माल असेल अशा प्रतिक्रिया अक्षयच्या चाहत्यांकडून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

“नुसरत आणि डायना पेंटींने सेल्फी स्क्वॉड जॉइन केलाय”, असे कॅप्शन देत अक्षयने व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Mehta (@raj_a_mehta)

- Advertisement -

सिनेमाच्या निर्मात्यांनी नुकताच सिनेमाच्या मुहूर्ताचा फोटो देखील शेअर केला होता. ज्यात सुंदर फुलांनी सजवलेल्या देव्हाऱ्यात गणपतीची मुर्ती आहे. सिनेमाच्या क्लॅप्सची पुजा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

तर अभिनेता इमरान हाशमीने देखील त्यांच्या सोशल मीडियावर “सेल्फी टाइम” असे कॅप्शन देत स्वत:चा कारमधील एक फोटो शेअर केला होता.


हेही वाचा – Blackbuck Poaching Case : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला दिलासा; आता सर्व प्रकरणावर सुनावणी हायकोर्टातच होणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -