घरCORONA UPDATEऐन कोरोनाच्या संकटात RPF जवानांच्या बदल्या!

ऐन कोरोनाच्या संकटात RPF जवानांच्या बदल्या!

Subscribe

कोरोनाच्या संकटकाळात विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. मात्र मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलातील ६० पेक्षा जास्त जवानांची बदली एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आंतरजिल्हा प्रवासाला बंदी असताना मध्य रेल्वेच्या ६० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याने आरपीफ जवान चांगलेच अडचणीत सापडले आहे. या कोरोनाकाळात दुसऱ्या जिल्हात मुलांच्या शिक्षणापासून ते कुटुंबियांना घेऊन कसं जायचं? असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे काही कालावधीसाठी रेल्वे प्रशानाने या बदल्यांना स्थगिती देण्यात यावी अशी मागणी काही जवानांनी ‘आपलं महानगर-माय महानगर’शी बोलताना केली आहे.

कोरोनाच्या संकटात घर, शाळेची शोधाशोध!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. एसटी बस, प्रवासी वाहतूक गाड्यांसह देशभरातील रेल्वे सेवा बंद, अशा आपत्कालीन परिस्थितीत फक्त काही विशेष रेल्वे गाड्या धावत आहे. तसेच महाराष्ट्रात सुद्धा गेली तीन महिन्यापासून आंतरजिल्हा प्रवासात बंदी आहेत. अशा कठीण परिस्थिती मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलालातील ६० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या जिल्हात बदल्या करण्यात आल्या आहे. मुंबई विभागातील काही आरपीएफ जवानांना नागपूर विभाग, तर भुसावळ विभागातील काही जवानांची मुंबई विभागात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबीयांना घेऊन जाताना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

- Advertisement -

आगोदरच मुलांचे शैक्षणिक सत्र केव्हा सुरु होणार याची कल्पना नाही. त्या मुलांचं दुसऱ्या जिल्हाच्या शाळेत या संकटकाळात अॅडमिशन करण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. विशेष म्हणजे या बदली केलेल्या काही जवानांची मुले दिव्यांग आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना काही कालावधीसाठी तात्काळ स्थगिती देण्यात यायला हवी होती. ‘आपलं महानगर-माय महानगरशी बोलताना काही जवानांनी सांगितले कि, ‘गेल्यावर्षी २०१९ मध्ये ट्रान्सफर ऑर्डर आली होती. मात्र आम्हाला एक वर्ष आणखी सेवा वाढवून देण्यात आली. नियमानुसार यावर्षी आमचा मुदतीचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आम्हाला आमची बदली केलेल्या जागी जावे लागणार आहे. मात्र, कोरोना संकट पाहता रेल्वे प्रशासनाने यावर विचार करायला हवा होता’.

रेल्वे बोर्डाने पुनर्विचार करावा

‘बदली केलेल्या जवानांपैकी अनेकजण आपल्या कुटूंबियांबरोबर राहत आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण सुरु आहे. अशा वेळी त्यांच्या बदल्या केल्याने दुसरीकडे मुलांना शाळेत कसा प्रवेश मिळणार? यात काही जवानांची मुले शंभर टक्के दिव्यांग आहेत. या सर्व अडचणींवर रेल्वे सुरक्षा दलाने आणि रेल्वे बोर्डाने गांभीर्याने विचार करायाला हवा’, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते दीपक दुबे यांनी दिली आहे.

आम्ही या संकटकाळात कोणत्याही नवीन जवानांची बदली केलेली नाही. रेल्वे सुरक्षा दलातील ज्या कर्मचाऱ्यांची मागील वर्षी बदली होणार होती, त्यांना आम्ही एक वर्ष मुदत वाढवून दिली होती. मात्र आता त्यांची मुदत संपली असून अशा कर्मचाऱ्यांचीच आता बदली करण्यात आली आहे.

अश्रफ के.के., विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -