राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

rain update the possibility of torrential rains for the next five days in state imd

मागील काही दिवसांपासून थंडीला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे आता जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच तीन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील काही भागांत उद्यापासून पुढील तीन दिवसांसाठी जोरदार पावसाची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्य़ा प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी देखील हवालदील झाला आहे. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे.

हवामान विभागाकडून पश्चिम महाराष्ट्रासह, मुंबई, पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेत. मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि इतर जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये कोसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ३० नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवसांसाठी राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हेही वाचा: राणी बागेतील पहिलीच सभा भाजपने गाजवली ; महापौरांनी गोंधळात कामकाज