घरताज्या घडामोडीदिलासा! आफ्रिकेतून आलेले नाशिकचे दोन्ही आयर्नमॅन निगेटिव्ह

दिलासा! आफ्रिकेतून आलेले नाशिकचे दोन्ही आयर्नमॅन निगेटिव्ह

Subscribe

भगर उद्योजक महेंद्र छोरिया आणि प्रशांत डबरी हे दोघेही गेल्याच आठवड्यात नाशिकमध्ये परतले

नाशिक – दक्षिण आफ्रिकेत नव्या ओमिक्रॉन व्हेयिरंटचा फैलाव होत असल्याची बातमी ताजी असतानाच दक्षिण आफ्रिकेतून आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून नाशकात दाखल झालेल्या खेळाडूंनी प्रशासनाची चिंता वाढवली होती. मात्र, सायंकाळी या दोघांचेही कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरसने भारतासह अनेक देशांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू आहे. राज्यात अद्याप ओमिक्रॉनचा एकही रूग्ण आढळलेला नाही. मात्र, नाशिकमध्ये गेल्याच आठवड्यात दोन व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करून आल्याने नाशिककरांची चिंता वाढली होती. भगर उद्योजक महेंद्र छोरिया आणि प्रशांत डबरी हे दोघेही आफ्रिकेत गेलेल होते. महापालिकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असून, दोघांना होम क्वारंटनाइन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी या दोघांचेही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -