घरताज्या घडामोडीRaj Thackeray : पुणे दौऱ्यात राज ठाकरेंनी पंगतीचा मोडला नियम, कारण...

Raj Thackeray : पुणे दौऱ्यात राज ठाकरेंनी पंगतीचा मोडला नियम, कारण…

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक, औरंगाबादच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात राज ठाकरेंनी बुधवारी मुक्काम केल्यानंतर गुरुवारी पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान दुपारी जेवण करतानाचा राज ठाकरेंचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. राज ठाकरे एका पदाधिकाऱ्याच्या घरी जेवण करण्यासाठी गेले होते त्यावेळीचा हा फोटो आहे. पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र राज ठाकरे यांचा जेवण करतानाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

पुण्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंचा पुणे दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पुण्याचा राज ठाकरे यांनी यापुर्वीही दौरा केला आहे. पक्षातील पदाधिकारी आणि शाखा अध्यक्षांच्या बैठका राज ठाकरे यांनी घेतल्या आहेत. तसेच आताच्या दौऱ्यात राज ठाकरे कामाचा आढावा घेत आहेत. दरम्यान दुसऱ्या दिवशीच्या दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेचे उपविभाग अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या घरी जेवणाचा अस्वाद घेतला आहे. जेवणासाठी पंगतीला बसलेल्या राज ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेवण्यासाठी पंगतीला बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत पु्ण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे (तात्या) आणि इतर पदाधिकारी आहेत. परंतु जेवणाच्या पंगतीला काही मंडळी खाली जमिनीवर बसले आहेत. तर राज ठाकरे मात्र खुर्चीवर बसेलेले दिसत आहे. पंगतीला सगळे खाली बसलेले असताना राज ठाकरे खुर्चीवर बसल्यामुळे पंगतीचा नियम मोडला आहे.

राज ठाकरेंनी पंगतीचा नियम मोडला कारण…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेवण करताना पंगतीचा नियम मोडला आहे. याचं कारणही पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांच्या कमरेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बाजूला पंगतीत बसणारे राज ठाकरे खुर्चीवर बसून जेवण करत होते. महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी नाशिकमध्येही कमरेच्या दुखण्यामुळे दौरा वेगाने आटोपला तर काही ठिकाणी त्यांनी गाडीतून खाली न उतरणेच पसंत केले होते. औरंगाबाद दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी त्यांच्या दुखण्याबाबत माहिती दिली होती. त्यांना शस्त्रक्रियेनंतरही कंबरेच्या दुखण्याचा त्रास होत असला्याचे सांगितले होते. राज ठाकरे यांची तब्येत बिघडल्यामुळे मध्यंतरी दौरे रद्द करण्यात आले होते. आता पुन्हा राज ठाकरे जोमाने कामाला लागले असून मनसेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Rupali Patil Thombare: रुपाली पाटलांच्या पक्षप्रवेशावर अजितदादा म्हणाले… आगीतून फुफाट्यात होणार नाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -