घरमहाराष्ट्रराज्यसभेची 'निवडणूक' होणार, शिवसेना-भाजपमध्ये सामना रंगणार

राज्यसभेची ‘निवडणूक’ होणार, शिवसेना-भाजपमध्ये सामना रंगणार

Subscribe

विधानसभेचे संख्याबळ 288 आहे. यातून फॉर्म्युल्याचा वापरू करुन राज्यसभेसाठीच्या मतदानाचा कोटा ठरवला जातो. फॉर्म्युल्यानुसार 288/ [6+1] +1 = 42 असे उत्तर येते. याचा अर्थ राज्यसभेसाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 42 मते मिळवावी लागतील. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे.

मुंबईः राज्यसभेच्या निवडणुकीची सुंदोपसुंदी वाढत असतानाच आता थेट शिवसेना-भाजपमध्ये सामना रंगणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. आज दुपारी 3 वाजता राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली असल्यानं आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत होणार आहे. शिवसेनेनं दोन, काँग्रेसनं एक, राष्ट्रवादीनं एक आणि भाजपनं तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा केला आहे.

महाविकास आघाडीचे नेते आज देवेंद्र फडणवीस आणि मी तासभर चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव असा होता, तुम्ही राज्यसभेची तिसरी जागा मागे घ्या आणि आम्ही विधान परिषदेची एक जागा तुम्हाला जास्त देऊ. आमचा प्रस्ताव असा होता की, तुम्ही राज्यसभेसाठीची दुसरी जागा मागे घ्या, मग विधान परिषदेची पाचवी जागा आम्ही लढवणार नाही. त्यानंतर म्हणजे 11.30 नंतर कुठलाच संवाद महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झाला नाही. वेगवेगळ्या बातम्या फक्त कानावर येत राहिल्या. अधिकृतपणे कोणीही बोललं नाही आणि आता 3 वाजले, त्यामुळे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टी ही तिसरी जागा 100 टक्के लढवणार असून, ती जिंकेल, असा विश्वासही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलाय. त्यामुळे या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणुकीचा जोर वाढणार आहे.

- Advertisement -

नेमकं गणित काय?

विधानसभेचे संख्याबळ 288 आहे. यातून फॉर्म्युल्याचा वापरू करुन राज्यसभेसाठीच्या मतदानाचा कोटा ठरवला जातो. फॉर्म्युल्यानुसार 288/ [6+1] +1 = 42 असे उत्तर येते. याचा अर्थ राज्यसभेसाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 42 मते मिळवावी लागतील. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे विधानसभेतील आमदारांचं संख्याबळ 287 झालं आहे. फॉर्म्युलानुसार 288/6+1+1 = 42 म्हणजेच एक राज्यसभा उमेदवाराला 42 मते मिळवावी लागतील. भाजपकडून दोन उमेदवार विजयी होतील. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे एक-एक उमेदवाराला विजयी होईल येवढे संख्याबळ आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडी असल्याने ते आणखी एक उमेदवार राज्यसभेवर पाठवू शकतात. त्यामुळे शिवसेनेने राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. भाजपनंही तिसरा उमेदवार दिल्यानं या निवडणुकीची रंगत वाढली आहे.

अपक्षांचा भाव वाढला

राज्यसभेच्या निवडणुकीमुळे श्यामसुंदर शिंदे- लोहा, किशोर जोरगेवार- चंद्रपूर, गीता जैन- मीरा भाईंदर, नरेंद्र भोंडेकर- भंडारा, आशिष जयस्वाल- रामटेक, संजय शिंदे- करमाळा, चंद्रकांत पाटील- मुक्ताईनगर, मंजुषा गावित- साक्री, विनोद अग्रवाल- गोंदिया, प्रकाश आव्हाडे- इचलकरंजी, राजेंद्र राऊत- बार्शी, महेश बालदी- उरण, रवी राणा- बडनेरा या 14 आमदारांचा भाव वाढला आहे. आता हे आमदार कोणाच्या पारड्यात वजन टाकणार हे लवकरच समजणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा: राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढली, काँग्रेस, भाजप आणि सेनेच्या बैठकांवर बैठका, काय होणार?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -