घरमहाराष्ट्र'उद्धव ठाकरे दहावेळा जरी अयोध्येला गेले तरी त्याचा उपयोग नाही'

‘उद्धव ठाकरे दहावेळा जरी अयोध्येला गेले तरी त्याचा उपयोग नाही’

Subscribe

'उद्धव ठाकरे हे दहावेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल',असा टोला रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

गेल्या वर्षी आयोध्येच्या मुद्यावरून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी शिवसेना पुन्हा एकदा आयोध्येला जाणार आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे १६ जूनला आपल्या विजयी खासदारांसह आयोध्येत जाणार आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृत्वाखाली हा दौरा आयोजीत करण्यात आला आहे. अयोध्येतील रामलल्ला मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत. शिवसेनेच्या या दौऱ्याची रिपाई नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खिल्ली उडवली आहे. ‘उद्धव ठाकरे हे दहावेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल‘,असे आठवले यांनी म्हटले आहे.

पहले मंदिरफिर सरकार…’

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत. या घवघवीत यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी ठाकरे कुटुंबासह कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात जाऊन देवीचे देखील दर्शन घेतले असून आता ते अयोध्येच्या दौऱ्याला जाणार आहे. उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्याला जाणार असल्याने देशभरात एकच चर्चा सुरु आहे. तसेच मागील वर्षी उद्धव ठाकरे यांनी पहले मंदिरफिर सरकार…’ अशी घोषणा दिली होती. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपावर पुन्हा एकादा दबाव टाकण्यासाटी त्यांचा हा दौरा असल्याचे बोले जात आहे.

- Advertisement -

काय म्हणाले आठवले?

या दौऱ्याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धव ठाकरे यांचा हा दौरा शिवसेनेच्या नव्या खासदारांना अयोध्या दाखवण्यासाठी असेल तर काही हरकत नाही. पण मंदिर उभारणीसाठी त्याचा उपयोग होणार नाही. उद्धव ठाकरे दहा वेळा अयोध्येला गेले तरी मंदिर होणार नाही. राम मंदिर व्हावे, असे माझेही मत आहे. मात्र, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट पाहावी लागेल, असे ते म्हणाले.


हेही वाचा – १६ जूनला उद्धव ठाकरे अयोध्येत

- Advertisement -

हेही वाचा – युतीबाबत आमचं ठरलंय – उद्धव ठाकरे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -