घरताज्या घडामोडीकाच फोडायची हे मर्दानगीचे लक्षण नाही, रामदास कदमांचा सुभाष देसाईंवर निशाणा

काच फोडायची हे मर्दानगीचे लक्षण नाही, रामदास कदमांचा सुभाष देसाईंवर निशाणा

Subscribe

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर शिंदे गटातील आमदारांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच हाताला दगड बांधून काच फोडायची हे मर्दानगीचे लक्षण नाही, अशा शब्दांत रामदास कदम यांनी सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.

अशाप्रकारे भ्याडपणे हल्ला करणे, हाताला दगड बांधून काच फोडायची हे मर्दानगीचे लक्षण नाही. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मी काही बोलणार नाही. परंतु उत्स्फुर्त प्रतिक्रिया देणाऱ्यांची प्रतिमा संबंध महाराष्ट्राने पाहिली आहे. प्रत्येक कॅबिनेटमध्ये झोपा काढलेला माणूस जागा होऊन बोलतोय त्याचे आश्चर्य वाटते, असं रामदास कदम म्हणाले.

- Advertisement -

विधिमंडळात ज्याच्याकडे सर्वाधिक बहुमत असते ती ग्राह्य मानली जाते, असा माझा अभ्यास आहे. परंतु न्यायालयाच्या बाबतीत टीका करणं योग्य नाही. एकाबाजूला १५ आमदार आणि दुसऱ्या बाजूला ५१ आमदार इतकी मोठी तफावत आहे. त्याच्यामुळे नियमानुसारच निर्णय होईल, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.

उदय सामंत यांच्या गाडीवर काल (मंगळवार) रात्री पुण्यात कात्रज चौकात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरूवात केली. याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री पुणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.


हेही वाचा : विषय गंभीर, अर्ध्यावर सोडू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना भावनिक आवाहन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -