“उद्धव ठाकरे मातोश्रीवर लपून खोके मोजायचे, रश्मी वहिनी ‘वर्षा’ वर कंत्राटदारांना भेटायच्या”

वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांना लगेच कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं. भरत गोगावले यांना मंत्रिपद दिलं असतं तरी चाललं असतं. रश्मी ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, याचंच मला आश्चर्य वाटतं, असा खोचक टोलाही रामदास कदम यांनी लगावला.

रत्नागिरी – शिंदे गटातील आमदार रामदास कदम यांनी नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीवर लपून खोके मोजत बसायचे आणि रश्मी ठाकरे वर्षा बंगल्यावर येऊन कंत्राटदारांना भेटायच्या असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केलाय. ते दापोलीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा – शंदे सरकारच्या दुसर्‍या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? दसर्‍याआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता

रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात केवळ तीनवेळा गेले. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजत बसायचे. रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटायच्या, असा सणसणीत आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

हेही वाचा – पुण्यात अपघातांची मालिका थांबेना! शिवशाही बस आणि कंटेनरच्या धडकेत 1 ठार, 6 जखमी

वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांना लगेच कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं. भरत गोगावले यांना मंत्रिपद दिलं असतं तरी चाललं असतं. रश्मी ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, याचंच मला आश्चर्य वाटतं, असा खोचक टोलाही रामदास कदम यांनी लगावला.

…म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले

महाविकास आघाडी स्थापन होताना मढ येथील बंगल्यावर एक बैठक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवून या माझ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा, असं म्हटलं होतं. मात्र, त्या रात्रीत एकदम बदल झाला. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन शरद पवारांच्या घरी गेले. ‘माझी बायको रडत आहे. डोकं आपटत आहे. तू मुख्यमंत्री हो, मला वर्षा बंगल्यावर जायचं आहे,’ असा उद्धव ठाकरेंचा निरोप होता. संजय राऊतांनी हा निरोप शरद पवारांनापर्यंत पोहोचवल्यानंतर एका रात्रीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले. त्यानंतर, दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं नाव घोषित केलं. अशाप्रकारे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची फसवणूक केली.

हेही वाचा – राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निकाल; 608 पैकी 51 ग्रामपंचायती बिनविरोध