घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे १७ आमदार भाजपच्या वाटेवर?; रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे १७ आमदार भाजपच्या वाटेवर?; रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

Subscribe

विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच

अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. मात्र या पुर्वीच भाजपने विरोधी पक्षातील आमदारांच्या पक्षप्रवेशाचा तगादाच लावला आहे. एकीकडे राष्ट्रवादीला गळती लागली असतांना राष्ट्रवादीचे १७ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच, काँग्रेसचे दिग्गज नेते मंडळी देखील भाजपत प्रवेशासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र सामाजिक समीकरण आणि राजकिय परिस्थिती विचारात घेऊन त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल, असे दानवे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे १७ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक

विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला लागलेली गळती काही थांबायला तयार नाही. त्यातच आता राष्ट्रवादीचे १७ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

- Advertisement -

पक्षातील कार्यकर्त्यांना दिला कानंमत्र

दरम्यान, भाजपात होत इनकमिंग असल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही.पक्षात कुणी आले तरी आपले काम एकनिष्ठेने सुरूच ठेवायचे असते. एक दिवस तुम्हाला नक्कीच तुम्हाला न्याय मिळत असतो, असा कानमंत्र दानवेंनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -