घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराऊत उद्या सिन्नरला शिंदे गटाच्या कबड्डी ‘आखाड्यात’

राऊत उद्या सिन्नरला शिंदे गटाच्या कबड्डी ‘आखाड्यात’

Subscribe

नाशिक : ईडीच्या कोठडीतून बाहेर आल्यानंतर प्रथमच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे गुरुवार (दि.1) पासून दोन दिवस नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. शुक्रवारी (दि.2) सकाळी ते सिन्नर येथील कबड्डी स्पर्धेला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धा शिंदे गटाचे समर्थक आणि पालकमंत्री दादा भुसे याचे निकटवतीर्र्य उदय सांगळे यांच्या पुढाकारातून होत आहेत. खासदार राऊतांनी हे निमंत्रण कसे स्विकारले आणि यामागे काय रहस्य दडलय याविषयी शिवसैनिक विचारांत बुडाले आहेत.

शिवसेना उध्दव ठाकरे  गटाचे 12 माजी नगरसेवक हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काही घडलेच नाही. शिवसेना एकसंध असल्याचे पुन्हा प्रतिबिंबीत झाले. एकिकडे असे वातावरण असताना संजय राऊत हे गुरुवारी रात्री नाशिक दौर्‍यावर येणार असून 2 डिसेंबरला पदाधिकार्‍यांच्या मुलाखती आणि सायंकाळी मेळावा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सिन्नरला कबड्डी स्पर्धेलाही ते भेट देणार आहेत. उदय सांगळे यांनी या स्पर्धेसाठी पुढाकार घेतला आहे. सांगळे हे सध्या पालकमंत्री भुसे यांचे निकटवर्तीय आहेत. इतकेच नव्हे तर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मराठवाड्यातून आलेल्या शिवसैनिकांची नाशिकमध्ये राहण्याची व्यवस्था त्यांनी सांभाळली होती. गेल्या चार वर्षांपासून ते कबड्डी व कुस्ती स्पर्धा सिन्नरला घेतात.

- Advertisement -

कोरोनामुळे दोन वर्षे या स्पर्धा झालेल्या नाहीत. त्यामुळे नियमित असलेल्या या स्पर्धांना यंदा राजकीय रंग चढला आहे. सांगळे हे शिंदे गटाच्या उंबरठ्यावर असतांना राऊतांनी त्यांचे निमंत्रण कसे स्विकारले, याविषयी आता चर्चा आहे. दरम्यान, संजय राऊत हे मनमाड येथे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्याकडेही जाणार असल्याचे समजते. त्यामुळे नांदगाव तालुक्याच्या दौर्‍यात ते आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात काय संदेश देतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे. नाशिक शहरातील पक्षातील महत्वाच्या पदाधिकार्‍यांच्या आणि इच्छुक उमेदवारांशी ते ‘वन टू वन’ संवाद साधणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -