…तर घरात घुसून मारण्याची हिंमत; राणांचा बच्चू कडूंना इशारा

ravi rana againe direct warning to bachu kadu amravati politics

राज्यात एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे गट असा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे, तर दुसरीकडे दोन अपक्ष आमदारांमध्ये शाब्दिक वाद रंगत आहे. अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक टीका सुरु आहे. दोघांमधील वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत मिटवला. मात्र पुन्हा दोघांनी एकमेकांवर टीका डागणे सुरु ठेवले आहे. बच्चू कडूंनी आपल्या सभेतून तोंड मारणाऱ्यांचे तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही म्हणत राणांना इशारा दिला होता. बच्चू कडूंच्या या वक्तव्यावर आता राणांनी आज थेट घरात घुसून मारण्याची हिंमत असल्याचा इशारा दिला आहे.

बच्चू कडू यांच्या सभेनंतर राणा यांनी आद पुन्हा फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राणा म्हणाले की, मी सन्मानाने दोन पावले मागे झालो, कडू चार पावले मागे गेले, जर आम्हाला सातत्याने कोणी धमक्या देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमत आहे. कडू कसे आमदार होतात तेच पाहतो, अशा शब्दात राणांनी बच्चू कडूंना पुन्हा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची घमेंड होती, त्यांना राजीनामा द्यावा लागला. ज्या मुख्यमंत्र्याला घमेंड होते, त्याच्यावर हीच वेळ येते. कडू कसे आमदार होतात, पुढच्या निवडणुकीला कसे निवडून येतात ते मी पाहतो, अशा इशारा राणा यांनी दिला आहे. घाबरत कोणी नाही, मात्र प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे. काही चुका त्यांच्याकडून झाल्या त्यांनी पावले मागे येऊन दिलगिरीही व्यक्त केली, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी माझ्या वक्तव्यावर आक्षेप घेतला, मीही दोन पावले मागे जाऊन माफी मागितली. असही राणा म्हणाले.

बच्चू कडू काय म्हणाले?

अमरावतीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बच्चू कडूंनी रवी राणा यांना पहिलीच वेळ होती म्हणून माफी करतो, पण यापुढे अशी आगळीक घडली तर पुन्हा माफ करणार नाही. असं स्पष्टचं सांगितले. गरीबाची पोरगी पळाली की ती पळाली, मात्र श्रीमंताची पोरगी पळाली तर लव्ह मॅरेज अशातला हा प्रकार आहे. आज कोणत्या पक्षात बंडखोरीहोत नाही ते मला सांगा, खरंतर बंडखोरच आज पहिल्या पंक्तीत आहेत. आज सोशल मीडियावर सुद्धा पैशांनी चालतो. जो चलता है वही बिकता है. आज एकदा चूक झाली म्हणून ठिक आहे. पहिली वेळ आहे म्हणून माफ करतोय. पण प्रहारच्या वाटेत यापुढे कुणी येईल तर प्रहारचा वार कसा आहे ते आम्ही दाखवून देऊ, आम्ही गांधींना मानतो पण भगतसिंह देखील आमच्या डोक्यात आहे. यापुढे आमच्या वाट्याला गेल्यास माफ करणार नाही. असंही बच्चू कडू म्हणाले.


विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल 193.62 कोटींचा दंड वसूल