शिवसैनिक अनेकदा जेलमध्ये गेले, स्वत:चे जीवन शिवसेनेसाठी समर्पित केले; आमदार केसरकरांचा ठाकरेंना टोला

शिवसेनेचे बडे नेते आमच्यासोबत आहेत. या नेत्यांचे आता जेवढे वय आहे, तेवढी वर्षे त्यांनी शिवसेनेसाठी काम केले आहे. या नेत्यांनी मोठ-मोठी आंदोलन केली आहेत. अनेकदा जेलमध्ये गेले आहेत आणि अशा नेत्यांच्या रक्तामध्ये शिवसेना नाही असे म्हणत असतील, तर हा सर्वसामन्य शिवसैनिकाचा अपमान आहे.

deepak kesarkar

‘शिवसेनेचे बडे नेते आमच्यासोबत आहेत. या नेत्यांचे आता जेवढे वय आहे, तेवढी वर्षे त्यांनी शिवसेनेसाठी काम केले आहे. या नेत्यांनी मोठ-मोठी आंदोलन केली आहेत. अनेकदा जेलमध्ये गेले आहेत आणि अशा नेत्यांच्या रक्तामध्ये शिवसेना नाही असे म्हणत असतील, तर हा सर्वसामन्य शिवसैनिकाचा अपमान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाचा अपमान आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले. (rebel mla deepak kesarkar slams shiv sena leader aaditya thackeray )

“शिवसेना उभी एका नेत्यामुळे झाली ही वास्तुस्थिती आहे. पण शिवसेना उभी करण्यासाठी त्या नेत्याने हाक दिली, तेव्हा असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपले जीवन समर्पीत केले त्यानंतर बलाड्य अशी शिवसेना उभी राहिली आहे”, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

“शिवसेनेचे आमदार संजय राठोड, संदीपान भूमरे आणि दादा भूसे यांनी शिवसेनेसाठी आपले आयुष्य पणाला लावले. बाळासाहेबांच्या एका आवाजावर यांनी कामे केली. या तिघांचेही मोलाचे योगदान आहे. अनेकदा जेलमध्ये गेले आहेत. संदीपान भुमरे एक वर्ष जेलमध्ये होते. त्यामुळे अशा शिवसैनिकांनी जीवाची कुठलीही पर्वा न करता शिवसेना उभी केली असेल, तर त्यांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेणे आमच्या मनाला अतिशय लागले आहे”, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले.

“तुम्ही कितीही यात्रा काढा किंवा त्या यात्रांना काहीही नावे द्या. आम्ही तुमच्याबाबत कधी अनाधाराने बोललो नाहीये. पण शिवसेना ही बाळासाहेबांची आणि त्यांच्या विचारांची आहे. बाळासाहेब हे एकवचनी होते, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होते, ही वास्तूस्थिती आहे. पण त्यावेळी शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाले नाही, ते शांत राहिले. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी बोलवले होते. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्री पद सोडतो, तुम्ही मुख्यमंत्री व्हा.. त्यावेळी शिंदे यांनी म्हणाले होते की, तुम्हीच मुख्यमंत्रा राहा पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत नको. तुम्ही भाजपासोबत युती करा आणि त्या युतीचे मुख्यमंत्री व्हा, असे सांगितले होते”, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले.

आदित्य यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तुम्ही अजून लहान आहात आणि प्रादेशिक अस्मिता काय असते हे तुम्हाला ठावूक नाही. त्यामुळे आम्ही हाडाचे शिवसैनिक असून टीका करताना जरा विचार करुन बोला, असं म्हटलं.


हेही वाचा – सुहास कांदेंची नक्कीच भेट घेईन; बंडखोर आमदाराच्या आव्हानाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर