आंतरराष्ट्रीय संबंधित बाबींसाठी कोविड प्रतिबंधात्मक मात्रेच्या किमान कालावधीत कपात

कोविड लसीचा तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस घेण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी आता ९ महिन्यांवरून थेट ३ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

15-18 age group covid vaccination start from 3 january on 9 covid centre in mumbai
Corona Vaccination: १५ ते १८ वयोगटातील मुलांचे ३ जानेवारीपासून मुंबईतील ९ केंद्रावर लसीकरण

कोविड लसीचा तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस घेण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यानुसार ९ महिन्यांवरून थेट ३ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विदेशात प्रवास करू शकणाऱ्या व्यक्तीना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोविड प्रतिबंधात्मक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रौढ व्यक्तिंना दुसरी मात्रा घेतल्यानंतर ९ महिन्यांनी (३९ आठवड्यांनी) प्रतिबंधात्मक मात्रा बूस्टर डोस देण्यात येत आहे. तथापि, विविध कारणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास करणे गरजेचे असणा-या व्यक्तिंना या कालावधीत सवलत देण्यात यावी, अशी मागणी होत होती. या अनुषंगाने संबंधित तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार आता सदर बाबत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार ज्या व्यक्तिंना आंतरराष्ट्रीय प्रवास करणे गरजेचे आहे आणि ज्या देशात त्यांना जायचे आहे, त्या देशातील नियमांनुसार प्रतिबंधात्मक मात्रा घेतलेली असणे गरजेचे आहे, अशा व्यक्तिंना आता दुसरा डोस घेतल्यानंतर किमान ९० दिवसांनी तिसरा डोस घेता येणार आहे, अशी माहिती एका विशेष पत्राद्वारे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कळविली असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

‘कोविन ऍप’मध्ये व संबंधित संगणकीय प्रणालीत आवश्यक ते बदल केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्तरावर करण्यात आले असल्याचेही सदर पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर लशीची मात्रा देण्याबाबतच्या सर्व मार्गदर्शक सुचनांनुसार व वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक त्या बाबींची अंमलबजावणी सुयोग्यप्रकारे करणे आवश्यक आहे. तरी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक व खासगी लसीकरण केंद्रांनी याची नोंद घ्यावी व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात येत आहेत.

आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी व वय वर्षै ६० पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना सदर सुविधा शासकीय व महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर मिळेल‌. तसेच १८ वर्षे ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना खाजगी लसीकरण केंद्रावर सदर सुविधा उपलब्ध असेल.


हेही वाचा – शिवसेना देणार सहावा उमेदवार, संभाजीराजेंचा मार्ग खडतर