घरठाणेहिम्मत असेल तर राजीनामे द्या-खासदार राजन विचारे

हिम्मत असेल तर राजीनामे द्या-खासदार राजन विचारे

Subscribe

ठाणे । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यावेळी कंटाळून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून त्यांची मनधरणी करून पुन्हा शिवसेना पक्षात आणले. हीच माझी चूक होती. त्यानंतर त्यांना जिल्हाप्रमुख आणि महापौर पद मिळाले. परंतु आता ज्या पध्दतीचे राजकारण केले जात आहे, ते चुकीचे आहे. जर हिम्मत असेल तर राजीनामा दया आणि निवडणुकाला सामोरे जा असे आवाहन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाला दिले आहे.

उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर पाटील यांच्या खांद्यावर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र रविवारी त्यांनी आपण शिंदे गटासोबत असल्याचे सांगितले. या संदर्भात माहिती देण्यासाठी सोमवारी ठाण्यात ठाकरे गटाने पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी पाटील यांचे बंधू जयंत पाटील उपस्थित होते. त्यावेळी जयंत पाटील आणि विचारे यांनी भास्कर पाटील हे ठाकरे गटात असल्याचा दावा केला.

- Advertisement -

याप्रसंगी बोलताना विचारे यांनी म्हस्के हे पोलीसांना हाताशी घेऊन ज्या पध्दतीने कारवाई केली जात आहे, ती चुकीची असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या खांद्यावर बंदुका ठेवून गोळ्या झाडण्याचे काम बंद करा, अन्यथा जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांनी देखील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम केले पाहिजे. परंतु सध्या पोलीस यंत्रणा या राज्यकर्त्यांच्या धावणीला बांधल्याचे दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे हिम्मत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला.

भास्कर पाटील यांना काही जणांनी गाडीत बसवून नेले, त्यांच्यावर मानसिक दडपण होते. किंवा त्यांना देखील गुन्हा दाखल करण्याची भिती दाखविली गेली असेल अशी माहिती यावेळी त्यांचे बंधु जयंत पाटील यांनी दिली. परंतु ते आजही आमच्यासोबत असल्याचा दावा त्यांच्यासह खासदार विचारे यांनी देखील केला.पक्षात जबाबदारी मिळत नाही म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांकडे खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर मीच उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी करुन त्यांना विधानसभा क्षेत्र हे पद दिले आहे. असे विचारे यांनी सांगितले. परंतु त्यांना पद देताच, बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना आपल्याकडे वळविले असल्याचा आरोपही विचारे यांनी केला. मात्र ते आमच्या सोबतच असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भास्कर पाटील हे अनुपस्थित होते. नेमके पाटील कोणाकडे हा प्रश्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -