घरमहाराष्ट्रतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच - चंद्रकांत पाटील

तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच – चंद्रकांत पाटील

Subscribe

शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत भाजपपेक्षा एक जरी जागा जास्त मिळाली, तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असं सांगत युतीसाठी भाजप तयार असल्याचे सूतोवाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहेत.

गेली चार वर्षे सत्तेत सोबत असूनही न पटणाऱ्या शिवसेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न भाजपाकडून होताना दिसत आहे. नुसतं जुळवून घेतलं जात नाही तर भाजपाने शिवसेनेसमोर गुडघेच टेकल्याचे पहायला मिळत आहे. ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास भाजपची तयारी आहे. पण आमच्यापेक्षा शिवसेनेची एक जागा जास्त आली पाहिजे’, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी केलं आहे. गुरुवारी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले.

काँग्रेस-राष्ट्रवादी उडून जातील

‘शिवसेना आणि भाजपाने निवडणूक एकत्र लढल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भुर्रकन उडून जातील,’ असे वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले. तसेच मागील ४ वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने उल्लेखनीय यश मिळवले आहे. भाजपसोबत शिवसेनेनेही एकत्र यावे, जागांचा प्रश्न लगेचच सोडवला जाईल, असे देखील ते म्हणालेत. राज्यात भाजप सेनेच्या मिळून लोकसभेच्या ४२, तर विधानसभेच्या १८३ जागा आहेत. आम्ही एकत्र आल्यास आणखी जागा वाढतील, असा दावा त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – सरकार निवडणुकांपर्यंत जाहिरातींवर करणार १७ कोटी खर्च!


काय म्हणालेत चंद्रकांतदादा?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना हटवण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवणे महत्त्वाचे आहे. आधी एकत्र निवडणूक लढवू, निवडणूक एकत्र लढल्यावर निवडून आलेल्या जागांवरून मुख्यमंत्री ठरवता येईल. सेनेची एक जागा जरी जास्त आली तर मुख्यमंत्री सेनेचा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खासगीत भेटून एकत्रित निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, एकीकडे भाजप-शिवसेनेमध्ये युतीसाठी प्रयत्न होताना दिसत असतानाच दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मनसे जाण्याच्या तयारीत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. विदर्भ दौऱ्यावरून परतणाऱ्या राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एकत्र विमान प्रवास करून सत्ताधाऱ्यांना वेगळाच संदेश तर दिला नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -