घरदेश-विदेशबारामुलामध्ये चकमकीत लष्कर- ए- तोएबाचे दोन दहशतवादी ठार

बारामुलामध्ये चकमकीत लष्कर- ए- तोएबाचे दोन दहशतवादी ठार

Subscribe

बारामुलामध्ये झालेल्या चकमकीमध्ये लपून बसलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावरुन जवानांनी मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये आज चकमक झाली. या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. सकाळपासून बारामुलामध्ये दहशतवादी आणि जवानांमद्ये चकमक सुरु होते. हे दोन्ही दहशतवादी ‘लष्कर-ए-तोएबा’ या दहशतवादी संघटनेचे असल्याचे समोर आले आहे. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका सर्च ऑपरेशन दरम्यान जवानांवर गोळीबार गरण्यात आला तेव्हापासून चकमक सुरु झाली. या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून सर्च ऑपरेश संपले आहे. याआधी बुधवारी नौगाम येथे झालेल्या चकमकीतही दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले होते.

- Advertisement -

बारामुला परिसरातील अथोरा गावात दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर जवानांनी अथोरा गावाला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन सुरु केले. दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. जवानांनी देखील या गोळीबाराला चोखप्रत्युत्तर दिले. दिवसभर झालेल्या या चकमकीमध्ये लपून बसलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावरुन जवानांनी मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त केली आहे. दरम्यान चकमक संपली असल्याचे लष्कराने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -