Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी माफी मागा नाहीतर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं थोबाड रंगवू, चाकणकर यांचे दरेकरांना प्रत्युत्तर

माफी मागा नाहीतर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं थोबाड रंगवू, चाकणकर यांचे दरेकरांना प्रत्युत्तर

तुमच्या पक्षातील काही महिला आम्ही महिलांच्या कैवारी असल्याचे दाखवत आहेत त्यांची मला कीव वाटत आहे.

Related Story

- Advertisement -

गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला राष्ट्रवादी काँग्रेसकडे वेळ नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दरेकरांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दरेकरांनी माफी मागावी अन्यथा महिलांचा अपमान करणाऱ्यांचे आम्ही थोबाड आणि गाल रंगवू असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादीवर टीका करताना दरेकरांची जीभ घसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून दरेकरांवर टीका करण्यात येत आहेत. दरेकरांच्या वक्तव्यामध्ये अश्लील अर्थ नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चाकणकर यांनी म्हटलं आहे की, प्रवीण दरेकर तुम्ही जे वक्तव्य केलं आहे त्यावरुन असे वाटत आहे की, वैचारिकतेशी आणि अभ्यासाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. तुम्ही जे वाक्य म्हणालात ते मला उच्चारताना लाज आणि संकोच वाटत आहे. पण घेणं नाईलाज आहे. आपण म्हणालात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. आपण महिलांबद्दल बोलत असून महिलांना दुय्यम वागणूक देणं ही तुमची परंपरा आहे. आपल्या बोलण्यातून जी घाण टपकत आहे ती वैचारिकतेची दरिद्रता दाखवून देत आहे. तुमच्या पक्षातील काही महिला आम्ही महिलांच्या कैवारी असल्याचे दाखवत आहेत त्यांची मला कीव वाटत आहे. ज्या पक्षाचा विचार असा आहे त्या पक्षात या महिला काम करत आहेत. तुमच्या वक्तव्यावरुन पक्षाची संस्कृती दिसून येत आहे. तुम्ही या विधानाबद्दल माफी मागावी नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांचा अवमान करणाऱ्याचा गाल आणि थोबाड रंगवू शकतो असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

दरेकर काय म्हणाले होते?

शिरुर दौऱ्यावर असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, गरीबाला, छोट्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं, सत्ता देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच देऊ शकते. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबाकडे बघायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. सुभेदारांचा पक्ष, कारखानदारांचा पक्ष, बँकावाल्यांचा पक्ष, उद्योगपतींचा पक्ष, भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष,” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

- Advertisement -

राष्ट्रवादीवर प्रवीण दरेकर यांनी टीका करताना वाक्प्रचार वापरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष असल्याचे दरेकर यांनी म्हटलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, बरेच वाक्प्रचार आपण मराठीमध्ये सहजपणे आपण उच्चारत असतो. त्याचा जर फिजिकली अर्थ घ्यायचा झाला तर ते वेड पांघरुन पेडगावला जाण्यासारखे आहे. ते वाक्प्रचार हे त्या त्या वेळी एखादा अर्थ समजावण्यासाठी म्हटलेलं असते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कुठल्या पद्धतीने म्हटलं आहे की, तुम्हाला गरिबांच्या कल्याणाचे काही पडले नाही. जे श्रीमंत आहेत राजकीय दृष्ट्या प्रभावी आहेत. अशांचे तुम्हाला जास्त कळते. त्याच्यामुळे इतका गदारोळ करण्याचा कारण नाही. याचा अश्लील अर्थ प्रवीण दरेकर यांच्या मनात नाही आणि आमच्याही मनात नाही असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष’; टीका करताना दरेकरांची जीभ घसरली


 

- Advertisement -