घरमहाराष्ट्रराम मंदिरावरून भाजपवर 'सामना'तून टिकास्त्र

राम मंदिरावरून भाजपवर ‘सामना’तून टिकास्त्र

Subscribe

राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेनं सामनातून पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला आहे. यावेळी सामनातून संयम तरी किती बाळगावा असा सवाल केला आहे.

राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेनं सामनातून पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला आहे. यावेळी सामनातून संयम तरी किती बाळगावा असा सवाल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येताना दिसत आहे. तसंच सामनातून श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? असा सवाल देखील विचारला आहे. यावेळी त्यांनी नितीन गडकरी, मोहन भागवत आणि राजनाथ सिंह यांना देखील काही सवाल केले आहेत.तसंच आम्ही अयोध्या दौरा करून आम्ही राम मंदिराचा नियम पुन्हा राष्ट्रीय पातळीवर आणला असं देखील सामनामध्ये म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे ‘सामना’मध्ये ?

अयोध्येमध्ये राम मंदिर उभारावे यासाठी भारतीय जनता पक्षावर आतूनच दबाव आहे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीत राममंदिर कधी उभारणार ते सांगा? असे विचारले जात आहे व भाजप हायकमांडकडे त्याचे उत्तर नाही. संसदीय पक्षाच्या बैठकीत काही खासदारांनी पुन्हा राममंदिराचा प्रश्न विचारला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘मंदिरप्रश्नी संयम राखा, योग्य वेळी सर्वकाही होईल’ असे उत्तर दिले. याच वेळी नितीन गडकरी यांनी सल्ला दिला आहे. ‘एकमेकांच्या सहमतीने आणि सहकार्याने अयोध्येत राममंदिर उभारावे.’ भाजप अंतर्गत राममंदिरप्रश्नी अस्वस्थता निर्माण झाली आहे व राज्य चालवणाऱ्यांकडे कोणतीही ठोस योजना नाही. आम्ही अयोध्या दौरा केला व राममंदिराचा विषय पुन्हा राष्ट्रीय पातळीवर आणला. आम्ही अयोध्येत जाऊन हे केले नसते तर मंदिर विषय पुन्हा शरयूच्या गाळातच रुतला असता व मतांसाठी पुन्हा त्याच नदीत डुबक्या मारण्याचे प्रयोग सुरू झाले असते.

- Advertisement -

‘सहमतीने मंदिर बांधा.’ या दोन शब्दांनी हिंदुंना गांडू बनवले आहे. संयम आणि सहमतीच्या चिपळय़ा वाजवत बसले असते तर पंचवीस वर्षांपूर्वी अयोध्येत बाबरीचा कलंक नष्ट झाला नसता. तेव्हा ‘मंदिर वहीं बनाएंगे’ची भाषा होती व आता संयम, सहमतीची भाषा आहे. भाजपच्या एका खासदाराने बैठकीतच विचारले, ‘संयम कसला? आणि वाद तरी कसला? जर त्या जमिनीवर आता कोणताही ढांचा शिल्लक नाही, तर मग वाद कसला?’ यावर राज्यकर्त्यांकडे उत्तर नाही. पण पाच राज्यांतील विधानसभा निकालांनी भाजपला उत्तर दिले आहे.

श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? राजनाथ म्हणतात, ‘संयम.’ गडकरी म्हणतात, ‘सहमती’ व सरसंघचालक सांगतात, ‘रामाचीही वेळ येईल.’ पंचवीस वर्षे राम उघडय़ा तंबूत व आपण सारे सत्तेच्या खुर्च्या उबवत आहोत. पुन्हा राममंदिरावर कोणी काही बोलायचे नाही. राममंदिरावर अध्यादेश काढणे राहिले बाजूला, ज्यांनी मंदिरासाठी बाबरी पाडली त्यांच्यावरचे खटलेही तुम्ही काढू शकत नाही. राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपून जमाना झाला. लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रपती होणार नाहीत. तेव्हा बाबरी पतनाचे खटले काढा व बाबरीचे कोर्ट तरी बरखास्त करा. श्री. गडकरी, इथे तरी सहमती होऊ द्या!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -