घरताज्या घडामोडीसलमान खानला शस्त्र परवाना, स्वरक्षणासाठी एक शस्त्र वापरण्यास मुभा

सलमान खानला शस्त्र परवाना, स्वरक्षणासाठी एक शस्त्र वापरण्यास मुभा

Subscribe

निनावी पत्राद्वारे आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर दबंग अभिनेता सलमान खानला अखेर मुंबई पोलिसांकडून शस्त्र परवाना देण्यात आला आहे. आता सलमानकडे स्वरक्षणासाठी एक शस्त्र असणार आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानसह त्याचे लेखक वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. यासंदर्भात सलमाल खानने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर त्याला शस्त्र परवाना देण्यात आला आहे.

सलीम खान हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध लेखक असून सलमान खानचे वडील आहेत. ते सर्व जण सध्या वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्ड, बी. जे. रोडवरील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. सलीम खान नेहमी सकाळी साडेसहा ते साडेनऊ यादरम्यान वॉक आणि व्यायाम करण्यासाठी वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्ड परिसरात जातात. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे त्यांच्या सुरक्षा रक्षकासोबत बॅण्ड स्टॅण्डवर गेले होते. सकाळी पावणेआठ वाजता व्यायाम करून ते नेहमीच्या बेंचवर बसले होते. तिथेच त्यांना एक पत्र सापडले. या पत्रात सलीम खान, सलमान खान बहुत जल्दी आपका मुसेवाला होगा, अशी धमकी देऊन केजीबीएलबी असे लिहिले होते.

- Advertisement -

पत्रात जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने सलीम खान यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना ही माहिती दिली. त्यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या धमकीनंतर सलमानने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली होती. यावेळी त्याने शस्त्र परवान्यासाठी रितसर अर्ज केला होता. सलमान व त्याचे वडील सलीम खान यांना आलेल्या धमकीनंतर पोलीस आयुक्तांनी सलमानला शस्त्र परवाना देण्यास परवानगी दिली होती.

त्यानंतर त्याला दोन दिवसांपूर्वीच शस्त्र परवाना देण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सलमानच्या संरक्षणासाठी त्याचे खासगी बॉडीगार्ड आहेत. आता त्याला शस्त्र परवाना मिळाला आहे. त्यामुळे त्याच्यासोबत एक शस्त्र नेहमी राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -