घरCORONA UPDATEउपासमारीमुळे सलून व्यावसायिकाचा मुलासह आत्महत्येचा प्रयत्न!

उपासमारीमुळे सलून व्यावसायिकाचा मुलासह आत्महत्येचा प्रयत्न!

Subscribe

एकीकडे लॉकडाऊन काळात गेल्या तीन महिन्यांपासून सलून बंद असल्यामुळे सलून व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच या परिस्थितीचं भीषण चित्र समोर उभं करणारी एक घटना सांगलीत घडली आहे. सांगलीच्या इरळी भागामध्ये एका सलून व्यावसायिकाने उपासमारीला कंटाळून आपल्या लहान मुलासह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. झीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या व्यावसायिकाची आर्थिक स्थिती लॉकडाऊन काळात खालावल्यामुळे नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. या व्यावसायिकावर आणि त्याच्या मुलावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

राज्यातल्या सलून व्यावसायिकांच्या संघटनेने आता कोणत्याही परिस्थितीत सलून सुरू करण्याची मागणी तीव्र केली आहे. यासाठी राज्यात काही ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली. तसेच, येत्या १५ तारखेपासून सलून सुरू करण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी या सलून व्यावसायिकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये घडलेली घटना या परिस्थितीचं गांभीर्य समोर आणणारी ठरली आहे. स्थलांतरीत मजूर, छोटे व्यावसायिक, विक्रेते यांच्याप्रमाणेच सलून व्यावसायिकांची परिस्थिती देखील गंभीर झाली असून सलूनमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांचे दर वाढवण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या तीन महिन्यांपासून सलूनचा व्यवसाय बंद असल्यामुळे सदर व्यावसायिकावर आर्थिक आरिष्ट ओढवलं होतं. त्याने स्वत:सोबतच आपल्या मुलाला देखील त्याने विषारी औषध पाजल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या व्यावसायिकामागे त्याची पत्नी, दोन मुली आणि रुग्णालयात दाखल मुलगा असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -