घरमहाराष्ट्रराज्यसभा निवडणुकीत समाजवादीचा आघाडीला पाठिंबा, महाविकास आघाडीची बाजू भक्कम

राज्यसभा निवडणुकीत समाजवादीचा आघाडीला पाठिंबा, महाविकास आघाडीची बाजू भक्कम

Subscribe

समाजवादी पक्षाने  (Samajwadi Party) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून काही मुद्यांवर भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली होती. त्यानंतर अबू आझमी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती.

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे (samajwadi party support maha vikas aghadi in rajya sabha elections). आपली मते दुसरीकडे गेल्यास गडबड होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडी सोबतच रहा, असे आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने सांगितल्यामुळे आम्ही राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान ( vote) करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) यांनी बुधवारी जाहीर केले.

आघाडीच्या नेत्यांची भेट

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीतील मतदानाबाबत समाजवादी पक्षाने भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. समाजवादी पक्षाने  (Samajwadi Party) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून काही मुद्यांवर भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली होती. त्यानंतर अबू आझमी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर समाजवादीने महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

अखिलेख यादव यांचा आदेश

- Advertisement -

या संदर्भात अबू आझमी म्हणाले की,  आमचे प्रश्न आणि  काही समस्यांबाबत पत्र लिहिले होते. या प्रश्नावर आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यांनी काही प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. महाविकास आघाडीच्या पाठिंब्याबाबत आमच्या पक्षाचे अध्यक्ष अखिलेख यादव (Akhilekh Yadav) यांनी महाविकास आघाडीसोबत राहाण्याचे आम्हाला आदेश दिले आहेत. मत इतरत्र देऊ नका. दुसरीकडे मत गेल्यास गडबड होऊ शकते. त्यामुळे आम्ही राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत समाजवादी पक्षाचे स्वतः आझमी आणि रईस शेख असे दोन आमदार आहेत. समाजवादी पक्षाच्या दोन मतांची भर पडल्याने महाविकास आघाडीची बाजू मजबूत झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -