ऐतिहासिक चित्रपटांसाठी स्वतंत्र इतिहासकार समिती नेमा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी

sambhaji raje chhatrapati attack vedat marathe veer daudale saat and har har mahadev marathi movie

ऐतिहासिक घटनेवर आधारित हर हर महादेव या चित्रपटावरून सुरु असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ऐतिहासिक चित्रपटांसाठी स्वतंत्र इतिहासकार समिती नेमा, तसेच ऐतिहासिक चित्रपटांचे पहिलं स्क्रिनिंग हे महाराष्ट्रात झालं पाहिजे, मग दिल्लीतील दिल्लीतील सेन्सॉर बोर्डकडे पाठवा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भातील मागण्यांसाठी आज संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहणार आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत ऐतिहासिक चित्रपटांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी हर हर महादेव चित्रपटात दाखवलेल्या चुकीच्या इतिहासास कडाडून विरोध केला.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, इतिहासाची मोडतोड करुन चित्रपट दाखवणार असाल तर त्याला माझा वैयक्तिक विरोध असेल आणि शिवभक्तांचा विरोध आहे. ऐतिहासिक चित्रपट यायला हवेत पण एकंदरीत सिनेमॅटिक लिबर्टीचा फायदा घेत अनेक चित्रपट येत आहेत, ज्यात ऐतिहासिक घटनांची मोडतोड सिद्ध होते. नवीन पिढीला जो इतिहास दाखवला जातो, तोच इतिहास घेऊन ही पिढी पुढे जाणार आहे, दुर्दैवाने नवीन पिढी पुस्तकं वाचत नाही म्हणून जे चित्रपटात दाखवल जातं, तेच खरं मानलं जातं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

सेन्सॉर बोर्डात कुठे इतिहासकार आहेत कल्पना नाही

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली हर हर महादेव हा चित्रपट निघाला आहे त्यांनी काय सांगितलं की आम्हाला सेन्सॉर बोर्डच्या सर्व परवानगी आहे. सेन्सॉर बोर्ड कुठे बसलं आहे तर दिल्लीत, कुठे इतिहासकार आहेत कल्पना नाही, राज्यात इतिहासकार समिती नेमणं गरजेचे आहे, चित्रपटाचं पहिलं स्क्रिनिंग हे महाराष्ट्रात झालं पाहिजे, मग दिल्लीत जाऊ दे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे.

हर हर महादेव हा चित्रपट मी स्वत: पाहिला नाही, म चित्रपट तुम्ही बघू नका इतकी इतिहासाची मोडतोड त्यात केली आहे असं मला सांगितलं. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्याशी माझं बोलणं झालं, त्यांनी मला सविस्तर माहिती दिली आहे. त्या चित्रपटाबद्दल तीन चार उदाहरण सांगतो. जेदे देशमुख आणि बांदल देशमुख यांचा वाद यात दाखवण्यात आला आहे, जो वाद केव्हाचं नव्हता, उलट ती छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे, वाद कशावर दाखवला तर बकऱ्यावर.. एवढ्या मोठ्या घराण्याने स्वराज्यासाठी आपलं आयुष्य दिलं आणि त्याच्यातील असे वाद दाखवत आहेत हेच नवीन पिढीने घ्यायचं का? असा संतप्त सवालही संभाजीराजे छत्रपतींनी उपस्थित केला.

हर हर महादेव’मध्ये स्त्रियांचा बाजार

हर हर महादेवमध्ये स्त्रियांचा बाजार लावल्याचे दाखवण्यात आले आहे, हे शोभतं का? ही शिवाजी महाराजांची संस्कृती आहे का? हे आपण नवीन पिढीला दाखवायचं आहे का? हे कोण खपवून घेणार? कुठला इतिहासकार आहे सांगा ना की शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा बाजार भरत होता, कुठल्या इतिहासात लिहिलं गेल आहे, सांगावं. चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा चित्रपट काढू नका, असही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार आहे, ज्यात इतिहासकारांची एक स्वतंत्र समिती स्थापन करावी, त्यात प्रोटोकॉल ठरवून दिले पाहिजेत. तसेच ऐतिहासिक चित्रपटांचे पहिलं स्क्रिनिंग हे महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि नंतर दिल्लीतील सेन्सॉर बोर्डसमोर व्हावं. कारण आम्हाला सेंट्रल कमिटीवर काही विश्वास नाही, तिथे कोण इतिहासकार बसले माहित नाही, अशी माहितीही संभाजीराजे छत्रपतींनी दिली आहे.

तर ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत मी चुकीची भूमिका घेतो आहे असं मला कोणी सांगावं, त्यानंतर मी पुन्हा या चित्रपटावर कधीही भाष्य करणार नाही असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.


राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात